चाइल्ड करिअर इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सलबतपुर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
*चाईल्ड करीअर इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी*
नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील चाईल्ड करीअर इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये राजमाता जिजाऊ साहेब यांची व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध गीतावर नृत्य सादर केले. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब,स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी कार्यक्रमाचे आकर्षण ठरल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवत्त आदर्श मुख्याध्यापिका श्रीमती गावडे मॅडम उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती शारदा गोरे ,श्रीमती पूनम काळे या उपस्थित होत्या. कार्यक्रमा दरम्यान जय भवानी,जय शिवराय, जय जिजाऊ या घोषणांनी शालेय परिसर दणाणून गेला होता. कार्यक्रम प्रसंगी श्रीमती शारदा गोरे, श्रीमती गावडे मॅडम,संजय गरूटे यांनी जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची चरित्रे विद्यार्थ्यांना सांगितली.अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी प्राचार्य, प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेत
ले.