पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहूरी तालुका यांच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीचे औचित्य साधून पत्रकार सन्मान सोहळा संपन्न .

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहूरी तालुका यांच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीचे औचित्य साधून पत्रकार सन्मान सोहळा संपन्न .

                पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी तालुका यांच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती चे औचित्य साधून पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

                   या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा.अर्जुनपाटील बाचकर हे होते यावेळी जेष्ठ पत्रकार मा.संजय कुलकर्णी,हेमंत मिसाळ,विलास कुलकर्णी,रफिक भाई शेख, राजेंद्रजी वाडेकर,वजीर भाई शेख, सुनील नजन,प्रसाद मैड, गोविंद फुनगे, विलास गिरे, अशोक मंडलिक, नजीर शेख, रमेश खेमनर, प्रमोद डफळ, राजेंद्र म्हसे, सचिन पवार, कृष्णा गायकवाड,राजेंद्र पवार,आर.आर जाधव, बाळकृष्ण भोसले, अनिल कोळसे, सागर दोंदे,फोटोग्राफर टी. के, शरद पाचरणे, संतोष जाधव, मनोज साळवे, बंडू म्हसे,रियाज भाई देशमुख, आकाश येवले, राजेंद्र उंडे, आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

                    यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचा " *अहील्याभवण*" येथे सन्मान करण्यात आला यावेळी दैनिक सामनाचे पत्रकार राजेंद्र वाडेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्रतिष्ठानने सुरू केलेल्या अभ्यासिकेच्या माध्यमातून गरीब शोषित वंचित घटकांना विनामूल्य अभ्यासिका खुली करून देण्यात आली तसेच विद्यार्थ्यासाठी लागणारे पुस्तके व सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व पत्रकार बांधव प्रयत्नशील राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली.दैनिक सार्वमतचे प्रतिनिधी विलास कुलकर्णी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सुरू झालेले प्रतिष्ठान अहिल्यादेवींच्याच कार्याप्रमाणे शिक्षण,आरोग्य व भटक्या विमुक्त धनगर जमातीसाठी उल्लेखनीय कार्य करीत आहे.याचा अभिमान वाटत असल्याचे बोलले तसेच अहिल्यादेवींच्या कार्याचा विस्तृत परिचय करून देण्यात आला. यावेळी पत्रकार रफिक भाई शेख यांनी प्रतिष्ठानला सूचना करताना सांगितले की राहुरी कॉलेज रोडवर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची बारव उभी आहे ती जतन करण्यासाठी प्रतिष्ठानने पुढाकार घ्यावा.तेथे सुंदर असा बगीचा उभा करावा पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी भारतभर अतिशय मोठे काम उभे केले आहे .

           त्या एक आदर्शवत राज्य शासक होत्या त्यांचे काम कुठल्याही एका समाजासाठी नसून सबंध मानव जातीसाठी होते.त्यामुळे नगर जिल्ह्याच्या नामांतरासाठी या नावाला विरोध असण्याचा काहीही संबंध नाही असे मत मांडले.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय तमनर, सचिव ज्ञानेश्वर बाचकर, कार्याध्यक्ष दत्ताभाऊ खेडेकर,अनिल डोलनर,भारत मतकर, आप्पासाहेब सरोदे, श्रीकांत बाचकर,दत्ताभाऊ बाचकर, कोंडीराम बाचकर, वैभव तमनर, आदी प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते .