देडगाव मधील शाळेच्या परिसरात त्रास देणाऱ्या टारगट रोडरोमिओ वर कडक कारवाई करणार :- पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे
*देडगावतील शाळेच्या परिसरात त्रास देणाऱ्या टारगट रोडरोमिओचा बंदोबस्त करणार - पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे*
बालाजी देडगाव :- ( प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे शिक्षक - पालक मेळाव्यानिमित्त नेवासा तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांना आमंत्रित केले असता त्यांनी सदिच्छा भेट दिली . यावेळी मुलांच्या मनामधील पोलिसांची भीती व विविध प्रश्नावर मार्गदर्शन करण्यात आले.
______________________________________________________
अहिल्याबाई होळकर शाळेच्या परिसरात शालाबाह्य टारगट व रोड रोमिओ मुलींना त्रास देत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही .व त्यांच्यावर पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करणार आहे. मुलींना काही गैरप्रकार वाटला तर 112 या नंबर वर डायल करून गुप्त माहिती कळवा व प्रशासनाची मदत करा. व गावातील , शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घेऊन रोडरोमिओ यांचा शोध घेतला जाईल. पोलीस प्रशासन आपल्या मदतीला सज्ज राहील.
नेवासा पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे.
_____________________________________________________
आज अहिल्याबाई होळकर शाळेमध्ये पालक - शिक्षक मिळाव्या निमित्त पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी भूषविले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड यांनी केले .तर प्रमुख पाहुणे म्हणून नेवासा तालुक्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना म्हणाले की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे तो जो पितो तो गुरगुल्याशिवाय राहत नाही तो कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात चमकल्याशिवाय राहत नाही .व शिक्षकांचा सन्मान करा. थोरा मोठ्यांचा आदर ठेवा .समाजात ताठ मानेने जगायचे असेल तर शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच मुलींनी आपले संरक्षण स्वतः करावे .जर काही अडचण आल्यास 112 नंबर वर फोन करून प्रशासनाला कळवावे. नाव गुप्त ठेवले जाईल. व शाळाबाह्य रोड रोमिओ टार्गेट मुले जर मुलींना त्रास देत असेल तर ,त्यांचे नाव गुपित कळवा त्यांचा चोक बंदोबस्त पोलिस प्रशासन करेल. व त्यांच्यावर पुढील काळात योग्य ती कारवाई करण्यात येईल .गावामध्ये व शाळेच्या परिसर मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्याचे वरचेवर फुटेज घेऊन टारगटावर योग्य ती कडक कारवाई करण्यात येणार आहे .अशा अनेक विविध प्रश्नावर मार्गदर्शन करत आपल्या जीवनाविषयी व खडतर प्रवासाबद्दल अनमोल माहिती सांगितली.
यावेळी अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय व ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक डोईफोडे यांचा सन्मान करण्यात आला व शाळाबाह्य टारगटावर योग्य ती कडक कारवाई करावी असे पालकांच्या व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
पालक- शिक्षक मेळाव्यानिमित्त पोलीस नाईक साळवे दादा, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, मा. चेअरमन बुधाजी गोयकर,पावन महागणपतीचे अध्यक्ष संभाजीराव मुंगसे, डॉ. पोपट तांबे, श्रीकांत हिवाळे, पाटबंधारे विभागाचे रावण ससाणे, दिलीपराव चव्हाण मा, चेअरमन योसेफ हिवाळे, शरद हिवाळे, देविदास रक्ताटे, भारत औटी,शाळेचे पर्यवेक्षक चामुटे सर ,तज्ञशिक्षक डी.जी कदम सर व शिक्षक वृंद तसेच बहुसंख्येने पालक, पाचुंदा गावचे पालक व विद्यार्थी मित्र व गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर .एन गायकवाड सर यांनी केले तर आभार पत्रकार युनूस पठाण यांनी मानले.