शासनाने जाहीर केलेले दुधाचे 5 रु . अनुदान त्वरीत जमा करावे - सुरेशराव लांबे पाटील

शासनाने जाहीर केलेले दुधाचे 5 रु . अनुदान त्वरीत जमा करावे - सुरेशराव लांबे पाटील

शासनाने जाहीर केलेले दुधाचे 5 रु अनुदान त्वरीत जमा करावे-सुरेशराव लांबे पाटील,

 

राहुरी प्रतिनिधी

संपुर्ण राज्यातील दुध उत्पादक शेतकरी गेली अनेक दिवस दुध व्यवसाय तोट्यात असताना आपल्या गोमातेची सेवा करत आहे,शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दुधाचे दर मागील काही महिन्यांन पासून 22 रुपयांच्या खाली आलेले होते,

अशा परिस्थितीतही शासनाने चारा व पशुखाद्यांचे दर कमी केले नाही, त्यामुळे राज्यभरातील दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात असताना दुध दरवाढीसाठी आमच्यासह अनेकांनी मोर्चे आंदोलने केले होते, मोर्चे आंदोलने व लोकसभा निवडणु झालेला पराभव या कारणाने राज्य सरकारने निर्णय घेतला नि 5 रुपये अनुदान जाहीर केले,परंतु ते अनुदान अद्यापही जमा झाले नाही,जाहीर केलेले अनुदान थेट दुध उत्पादक शेतक-यांचा बॅक खात्यात त्वरीत जमा करावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष श्री.सुरेशराव लांबे पाटील यांनी केली,पुढे बोलताना लांबे म्हणाले की, शासन निर्णयात म्हटले होते की, राज्यातील खासगी तसेच सहकारी दुध संघांनी एक जुलै पासून ३.५ फँट व ८.५ एसएनएफ गुणप्रत असलेल्या दुधाला प्रती लिटर ३० रू. दर द्यावा व राज्य सरकारप्रति लिटर 5 रुपये अनुदान देईल,त्यानुसार राज्यातील बहुतांश दुध संघांनी शासन निर्णयानुसार दर देण्यास सुरुवात केली,मात्र राज्य शासनाने जाहीर केलेले 5 रुपये प्रति लिटर अनुदान शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेले नाही,पुढे बोलताना लांबे पाटील म्हणाले .

नाशिक विभागाचे दुग्ध विकास आयुक्त याच्याकडे ज्या ज्या दुध संघांच्या फाईल्स दाखल झालेल्या आहेत,त्या त्या संघांना दुध घालणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर त्वरीत अनुदान जमा करावे,शासनाने यामंधे लक्ष घालुन प्रत्येक दुध संघांनी लवकरात लवकर फाईल्स दुग्ध विकास आयुक्त यांच्याकडे सादर कराव्या असे लेखी आदेश देऊन दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरीत अनुदान जमा करुनकष्टकरी दुध उत्पादक शेतक-यांना सहकार्य करावे अशी विनंती करुन मागणी प्रहारचे राहुरी ता.अध्यक्ष व राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील शेतकरी नेते श्री.सुरेशराव लांबे पाटील यांनी केली .