त्या माथेफिरू अधिकाऱ्याची तक्रार थेट डॉ. निलम गोऱ्हे यांच्याकडे दाखल, राहुरी ता. शिवसेना महिला आघाडी पिडीत महिला कामगारांच्या पाठीशी .
*त्या माथेफिरू अधिकाऱ्याची तक्रार थेट डॉ.निलम गोऱ्हे यांच्याकडे*
*राहुरी ता.शिवसेना महिला आघाडी पिडीत महिला कामगारांच्या पाठीशी*
नगर येथे विधानपरिषदेच्या उपसभापती तथा शिवसेनच्या उपनेत्या डॉ.निलम ताई गोऱ्हे या लाडकी बहिण योजना सन्मान योजनेच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या.या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना महिला आघाडी संपर्क प्र.अड.उज्वला भोपळे, नगर दक्षिण जिल्हा प्रमुख डॉ.शबनम इनामदार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महिला आघाडीच्या राहुरी ता.प्रमुख वनिता जाधव यांच्या सह शिष्टमंडळाने भेट घेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी सहय्यक याच्या अश्लील वागणुकी विषयी तक्रारीचा पाढा वाचत तक्रार अर्ज दिला आहे.
डॉ.निलम गोऱ्हे यांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे कि, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील काम करणाऱ्या दहा ते बारा महिला गेल्या १३ वर्षापासून द्राक्ष विभागात काम करत होत्या. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून द्राक्ष विभागाकडे नव्याने बदलून आलेले कृषी सहय्यक सिताराम बाचकर हे महिलांसोबत अश्लील स्वरूपाच्या गप्पा मारून शरीर सुखाची मागणी करीत होता.परंतु कामावरील महिलांनी कोणतीही दाद न दिल्याने नव्याने आलेल्या मजूर ठेकेदाराला कृषी सहाय्यक सिताराम बाचकर याने सर्व कामगार महिलांसमोर सांगितले की “या सगळ्या कामावरील बायका बंद करून मला माझ्या पसंतीच्या काही मोजक्या बायका माझ्या कामावर घेऊन येत या, या सगळ्या बायका बंद करा.” असे सांगितल्यामुळे ठेकेदाराने दहा-बारा कामगार महिलांना कामावरून काढून टाकले आहे.
पिडीत महिलांनी म.फु.कृ.वि.राहुरी येथे कुलसचिव यांच्याकडे दि.४ जुलै २४ रोजी तक्रार केली होती.परंतु एक महिना उलटला तरीदेखील कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिलांच्या सन्मानार्थ अनेक योजना राबवत आहेत तर दुसऱ्या बाजूला म.फु.कृ.वि.प्रशासन वाईट मनोवृत्तीच्या अधिकाऱ्याला पाठीशी घालत आहे. सबंधित विकृत मनोवृत्ती असलेल्या कृषी सहाय्यक बाचकर याला तात्काळ निलंबित करून पिडीत महिलांना कामावर घेण्याची मागणी डॉ.निलम गोऱ्हे यांच्याकडे केलेली आहे.
– म.फु.कृ.वि.यांनी तात्काळ पिडीत महिलांना न्याय न दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाला निवेदना द्वारे दिलेला आहे.- वनिताताई जाधव,शिवसेना महिला आघाडी राहुरी ता. प्रमुख .