शेतकऱ्यांचा करजगाव सब स्टेशन वर ठिय्या , सिंगल फेज लाईट सोडल्याशिवाय उठणार नाही शेतकऱ्यांचा पवित्रा.

शेतकऱ्यांचा करजगाव सब स्टेशन वर ठिय्या , सिंगल फेज लाईट सोडल्याशिवाय उठणार नाही शेतकऱ्यांचा पवित्रा.

प्रतिनिधी संभाजी शिंदे नेवासा

शेतक-यांचा करजगाव सबस्टेशनवर ठिय्या 

वीज सोडल्याशिवाय उठणार नसल्याचा शेतक-यांची आक्रमक भुमिका

दोन दिवसापासुन करजगाव व चिमटा फिटरवर सिंगलफेज ट्रान्सफार्मर नसल्यामुळे वीज बंद असल्यामुळे वाड्या-वस्त्यावरील शेतक-यांनी सबस्टेशनवर आज गुरूवार रात्री आठ वाजता ठिय्या मांडला.परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे ग्रामस्थांनी वीज सोडण्याची मागणी केली आहे.

वस्तीवर अनेक शेतकरी राहत असल्यामुळे वीज सोडल्याशिवाय उपकेंद्रातुन उठणार नसल्याचा शेतक-यांनी आक्रमक भुमिका घेतली.

यावेळी उपसरपंच अशोकराव टेमक,नवनाथ कंक,कोळेकर,शिवाजी देवखिळे,पोपट मदने,संदिप पुंड,परसराम माकोणे,अमोल टेमक,ईश्वर गायकवाड,भाऊसाहेब गायकवाड,दिपक माकोणे,

दिपक कंक,धनंजय पुराणे,शिवाजी पुराणे आदी 

शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------

फीटरवर सिंगलफेज ट्रान्सफार्मर नसल्याभुळे वीज बंद करण्यात आली आहे.सिंगलफेज ट्रान्सफार्मर त्वरीत मागणी करून बसुन देऊ.तोपर्यत शेतक-यांनी दोन-तीन दिवस सहकार्य करावे. :- आकाश शेजुळे

सहाय्यक अभियंता नेवासा ग्रामीण

------------

आता पर्यत सिंगलफेज ट्रान्सफार्मर नसतांना वीज चालु होती.आता वीज सोडण्यास काय अडचण आहे. ?असा प्रश्न शेतक-यांनी उपस्थित केला.