आज 1 मे ६४ वा महाराष्ट्र दिन डि.पाॅल इंग्लिश मिडीअम हायस्कूल आगाशेनगर मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
श्रीरामपूर ( वार्ताहर) :- आज 1 मे ६४ वा महाराष्ट्र दिन डि.पाॅल इंग्लिश मिडीअम हायस्कूल ,आगाशेनगर मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी झेंडा वंदन शाळेचे मॅनेजर रेव्ह. फादर.थॉमस यांच्याहस्ते करण्यात आले.यानंतर त्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. मी. प्राचार्या सि.सेलीन यांनीही सर्वाना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र दिनानिमित्त शाळेतील शिक्षक भगिनींनी यावेळेस मतदान जाग्रृतीवर प्रभावी पथनाट्य सादर केले.
यामध्ये स्नेहल नेवेवाणी यानी प्रास्ताविक केले,जयश्री ब्राम्हणे ,सुनयना, एलिझाबेथ यानी प्रार्थनागीत सादर केले.सोनाली झांजरी यानी सूत्रसंचालन केले,स्वाती घोरपडे यानी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्र लोंढे सर ,संदीप निंबे सर ,सुनील बोरगे दीपक कदम यांचीही मोलाचे सहकार्य लाभले.