राहुरी कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांचा उपोषणाचा ३ रा दिवस विद्यापीठ प्रशासन निर्धास्त

राहुरी कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांचा उपोषणाचा ३ रा दिवस विद्यापीठ प्रशासन निर्धास्त

राहुरी कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेणेसाठी प्रकल्पग्रस्त कृती समितिने जि.प. सदस्य धनराज शिवाजीराजे गाडे पा. यांच्या समवेत राहुरी कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेश द्वारावर दि.१४.३.२०२२ पासून बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे.

आज उपोषणाचा ३ रा दिवस असूनही विद्यापीठ प्रशासनाने कोणताही ठोस असा निर्णय उपोषणार्थीना दिला नाही तसेच विद्यापीठाने शासनाकडे जलद गतीने पाठपुरवा करून हा प्रश्न सोडवने गरजेचे असताना तसे दिसून येत नाही उन्हाळ्याच्या तिवृ झळा वाढत असल्याने उपोषणार्थींची प्रकृती ढासळत चालली आहे. डिग्रस . राहुरी खूर्द .पिंप्री अवघड. सडे. खडांबे बुद्रुक. वरवंडी. या गावच्या ग्रामपंचायतींनी या उपोषणास सक्रीय पाठींबा असल्याचे पत्र देऊन जाहीर केले आहे.

तसेच माहीती अधिका र व पत्रकार संरक्षण संघटणा यांनी ही पत्र देऊन पाठींबा दर्शविला आहे.

या उपोषणार्थींना लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास हे उपोषण असेच चालु राहील न्याय मिळाल्याशिवाय आम्ही आरंभलेले उपोषण सोडणार नाही अशि ठाम भूमीका प्रकल्पग्रस्तांनी घेतली असल्याने उपोषणाचे दिवस वाढत गेले तर उपोषणार्थीच्या स्वास्थ्यावर मोठा परीणाम होऊन काही बरे वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील असे उपोषणार्थीं जि.प. सदस्य धनराज शिवाजीराजे गाडे पा. यांनी सांगितले ते पूढे म्हणाले विद्यापीठ स्थापनेवेळी जमिनि संपादन करताना प्रकल्पग्रस्तांना मोठ्या प्राधान्याने नोकरीच्या संधी देण्यात येतील असे आश्वासन दिले होते.

मात्र विद्यापीठाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी मोठ्या प्रमाणात वशिलेबाजिंनी स्वत च्या नातेवाईकांना सर्व निकष बाजुला ठेऊन विद्यापीठ सेवेत सामाविष्ठ करून घेवून प्रकल्पग्रस्ताच्या तोंडाला पाने पुसली व भूमीपूत्रांना भूमीहीन करून देशोधडीला लावण्याचा प्रयत्न या विद्यापीठ प्रशासनाने केला आहे.

व त्यांचेवर उपासमारीची वेळ आणली आहे.

ज्या ज्या वेळी प्रकल्पग्रस्त भूमी पू त्रांनीआपल्या न्याय हक्कासाठी लढा उभारला त्या त्या वेळी ह्या कृषी विद्यापीठ प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या डोक्याला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहेत.

म्हणून यावेळेस आम्ही न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा श्री गाडे यांनी दिला ' शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख श्री रावसाहेब खेवरे नाना यांनी उपोषणार्थी ची भेट घेवून शासनाच्या वरीष्ठांकडे संपर्क साधून हा प्रश्न मार्गि लावण्या साठी सक्रीय आहे.या उपोषणार्थींचा प्रश्न मार्गी लावणेसाठी माझे प्रयत्न असलेचे पै. रावसाहेब खेवरे यांनी सांगितले.

या उपोषणार्थींना विद्यापीठ प्रशासन न्याय देणार कि या गंभीर बाबींकडे पाठ फीरवते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.