शिवांकुर विद्यालयाची आषाढी पायी दिंडी वारी उत्साहात,आषाढी पायी दिंडी वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा - सचिव डॉ. प्रकाश पवार .

शिवांकुर विद्यालयाची आषाढी पायी दिंडी वारी उत्साहात,आषाढी पायी दिंडी वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा - सचिव डॉ. प्रकाश पवार .

*शिवांकुर विद्यालयाची आषाढी पायी दिंडी वारी उत्साहात* 

शिवांकुर विद्यालयातून आषाढी एकादशीनिमित्त आषाढी पायी दिंडी वारी श्रीक्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर पिंपरी अवघड या ठिकाणी काढण्यात आली 

 *आषाढी पायी दिंडी वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा आहे असे प्रतिपादन संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश पवार यांनी केले* .या आषाढी पायी दिंडी वारीमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला भजन टाळ मृदुंग याचा मनमुरांतपणे आनंद लुटला .

या पायी दिंडी सोहळ्यामध्ये विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा टोपी धोतर पायजमा कुर्ता तसेच मुलींनी नऊवार साडी नेसून डोक्यावर कलश तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या.

या पायी दिंडी सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी वारकरी दिंडीप्रमाणे रिंगण करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले त्यामध्ये लेझिम फुगडी अभंग गवळणी सादर केल्या या पायी दिंडी सोहळ्यामध्ये पिंपरी अवघड ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तसेच या दिंडी सोहळ्याचे कौतुक केले .

या पायी दिंडी सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, विश्वस्त भास्कर पवार, उत्तमराव पवार, सचिव डॉ. प्रकाश पवार, खजिनदार डॉ. किशोर पवार सौ मंगल ताई पवार युवराज पवार यांची उपस्थिती लाभली तसेच प्रमुख उपस्थित त्यांनी विद्यार्थ्यांबरोबर वारीचा आनंद घेतला तसेच संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया जाधव व आभार सुजाता तारडे यांनी केले.

या कार्यक्रमास मुख्याध्यापिका छाया जाधव मॅडम, पर्यवेक्षक अरुण खिलारी सर, किरण तारडे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, प्रियंका पांढरे, सुवर्णा थोरात, शितल फाटक, सुजाता तारडे, रुपाली रासने, सुनीता ढोकणे रोहिणी भाकरे, प्रिया लांबे, अनिता लांबे, तनुजा झुगे, पल्लवी भालदंड व लिपिक अमोल गाडे, अर्चना पाळंदे शिपाई शारदा तमनर, सिद्धेश्वर भोईटे,आदींसह बहुसंख्य पालक उपस्थित होते...