नेवासा तालुक्यातील देडगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच चंद्रकांत मुंगसे सह १२ सदस्याचा दणदणीत विजय .
बालाजी देडगाव :- (प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे गाव माजी मंत्री विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली व बाजीराव पाटील मुंगसे , कुंडलिक पाटील मुंगसे,ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्धन कदम, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, खरेदी विक्री संघाचे मा. संचालक कडूभाऊ तांबे , भाऊसाहेब मुंगसे, यांच्या अधिपत्याखाली बालाजी ग्राम विकास पॅनल चे सरपंच पदासाठी चंद्रकांत भानुदास मुंगसे सह सदस्य साठी १५ पैकी १३ उमेदवाराचा दणदणीत विजय झाला. असुन मतदाराने सहा व्यांदा सत्ता ताब्यात देउन या पॅनल वर विश्र्वास टाकला.
श्री बालाजी ग्रामविकास पॅनलच्या वतीने सरपंच पदासाठी चंद्रकांत भानुदास मुंगसे यांनी १५४५, मतदान मिळवून विजय मिळवला. तर सदस्य पदासाठी वार्ड क्रमांक १ :- मधून मुंगसे पोपट विठ्ठल ३१९, गोयकर अलका कानिफनाथ २६९, मुंगसे मीनाक्षी लक्ष्मण २८६, वार्ड क्रमांक २ मधून तांबे अंबादास काशिनाथ ६९५,मुंगसे बाळासाहेब ज्ञानदेव ६८९, दळवी सुषमा आनंद ९६५,वार्ड क्रमांक ३ मधून खांडे जालिंदर एकनाथ ३२७, मुथा राधिका अनिकेत ३३९,हिवाळे मार्था विश्वास ३०६, वार्ड क्रमांक ४ मधून कोकरे रत्नमाला लालबहादूर ३२६, तर वार्ड ५ मधून ससाणे अभिजीत भाऊसाहेब २१४,केशर महादेव १९२ यां सर्व उमेदवारांचा भरघोस मताने दणदणीत विजय झाला.
तर विरोधी पॅनलचे व्यंकटेश गोरगरीब पॅनलचे वार्ड४ मधुन गायकवाड उषा संजय २६८,
वार्ड नंबर ५ मधून कोकरे अर्जुन लक्ष्मण १८७विजय झाले .आहेत तर बालाजी शेतकरी पॅनल चे वार्ड ४ मधून कदम अविनाश भाऊसाहेब २७७ मताने विजय झाले आहेत.
तर बालाजी ग्रामविकास पॅनलच्या विजयी उमेदवाराचे फटाक्याच्या आतषबाजी मध्ये पारंपरिक वाद्याच्या गजरात गुलालाची उधळण करत विजयाची मिरवणुक काढण्यात आली.
या निवडणूक मतदान मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश भांगे तर मतमोजणी अधिकारी म्हणून देडगाव मंडलाधिकारी सुनील खंडागळे व तलाठी बालाजी मलदोडे यांनी काम पाहिले. या विजय बालाजी ग्रामविकास पॅनेलचे तालुक्यातून कौतुक व अभिनंदन होत आहे.