मुळा धरणात विनापरवाना टाकलेला मुरूम तात्काळ काढून घ्यावा अन्यथा पाणी करारनामा रद्द करू - जलसंपदा विभागाचा राहुरी कृषी विद्यापीठ अभियंत्यांना इशारा .

मुळा धरणात विनापरवाना टाकलेला मुरुम तात्काळ काढुन घ्यावा अन्यथा पाणी करारनामा रद्द करू ,जलसंपदा विभागाचा राहुरी कृषी विद्यापीठ अभियंत्यांना इशारा .
प्रतिनिधी:-आर .आर .जाधव
राहुरी कृषी विद्यापीठाने मुळाधरणातुन पाणी उपसा करण्यासाठी जॅकवेलचे काम केले असुन त्या मध्ये अप्रोच ब्रिज चे काम करावयाचे होते परतु सदर ठेकेदाराने अॅप्रोच ब्रिजचे काम करण्या ऐवजी जॅकवेलच्या भोवती विद्यापीठ प्रक्षेत्रातुनच ३००० ते ३५०० ब्रास इतका मुरुम महसुल विभागाला एकही रुपयाचे स्वामीत्वधन न भरता विना परवाना बेकायदेशीरपणे उत्खनन करून जलसंपदा विभागाच्या केणत्याही परवानगी शिवाय मुळा धरणात टाकाला म्हणुन पत्रकार सचिन पवार यांनी जलसंपदा विभागाकडे तक्रारी दाखल केल्या मात्र विद्यापीठ अभियंत्याला पाठीशी घालत जलसंपदा विभागाने कोणतीही कारवाई केली नाही . वारंवार तक्रार करूनही मुळा पाट बंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील आणी ज्याच्या काळात ' हा मुरूम टाकला उप अभियंता आण्णासाहेब आंधळे यांनी या बाबत 'कोणतीही ठोस कारवाई केली नाही .सदर मुरूम मुळा जलशयात टाकण्याचे काम सुरु असल्याचे माहीत असुन तसेच अनेक कार्यकर्त्यांनी श्री .आंधळे यांचे निदर्शनास आणून देऊन सुद्धा आंधळे यांनी ह्या प्रकाराकडे डोळेझाक केली व त्यानंतर श्री . आंधळे हे सेवा निवृत झाले .श्री .सचिन पवार यांच्या तक्रारी मध्ये केवळ प्रदिर्घ पत्रव्यावहार केला मात्र हा विनापरवाना टाकलेला मुरूम काढुन घेण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात केली नाही म्हणुन सचिन पवार यांनी पुनश्च मुख्य अभियंता जलसंपदा विभाग नाशिक यांचेकडे स्मरणपत्र देऊन उपोषणास बसणार असल्याचा इशारा देताच मुख्य अभियंत्यांनी जावक क्रमांक उमप्र/दप / ३१९५ / २०२३ दि २/८/२०२३ रोजी अधिक्षक अभियंता जलसंपदा विभाग नाशिक यांना पत्र देऊन सदरचे गैरप्रकारा बाबत संबंधिता वर कारवाई करण्याचे लेखी आदेश दिले असे असतानाहीं सदर बाबत मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर यांचेकडून वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही म्हणुन सचिन पवार हे दि १५ ऑगस्ट २०२३ रोजी मुळा धरणाच्या भिंतीच्या प्रवेशद्वारावर उपोषणाला बसणार आहेत .
सदरचे उपोषण हे राहुरी कृषी विद्यापीठ अभियंत्यांच्या विरोधात असल्याने विद्यापीठ अभियंत्यांची भुमिका स्पष्ट झालेली नाही .अशी उपोषणे, आंदोलने शिताफीने हातळण्यात विद्यापीठ अभियंता माहीर आहेत त्यामुळे सचिन पवार यांनी आरंभलेले उपोषण विद्यापीठ अभियंता शिताफीने हातळुन थांबवतात कि सचिन पवार हे सदर उपोषणाचा लढा यशस्वी पणे पार पाडून बाजी मारतात याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागुन आहे .