ख्रिश्चन धर्मगुरूवर होणारे हल्ले व धर्मांतराच्या नावाखाली होणारी विनाकारण बदनामी निषेधार्थ सकल मुकमोर्चा शांततेत यशस्वी.
ख्रिश्चन धर्मगुरूवर होणारे हल्ले व धर्मांतराच्या नावाखाली होणारी विनाकारण बदनामी निषेधार्थ सकल मुकमोर्चा शांततेत यशस्वी.
सकल मुकमोर्चा....
आज दिनांक १७ जानेवारी श्रीरामपूर शहरात ख्रिश्चन धर्मगुरूवर होणारे हल्ले व धर्मांतराच्या नावाखाली होणारी विनाकारण बदनामी निषेधार्थ सकल मुकमोर्चा श्रीरामपूर शहरात मंगळवार दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ठिक १०:००वाजता श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने ख्रिस्ती समाजावर होणारा अन्याय ,, धर्मगुरू वर होणारे हल्ले,, चर्चवर होणारे हल्ले,, धार्मिक विंधीची विटंबना,, धर्मांतरासाठी खोटे गुन्हे दाखल केले जाते यासंदर्भात श्रीरामपूर शहरात अखिल ख्रिस्ती समाजांच्या वतीने मुक मोर्चा काढण्यात आला.
सदरचा मुकमोर्चाची सूरूवात मंगळवार दिनांक १७ जानेवारी सकाळी ठिक १०:०० वाजता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू होऊन मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड ते प्रांत कार्यालय असा असणार याप्रसगी तहसिलदार व प्रांत साहेब श्रीरामपूर यांना निवेदन देण्यात आले.आपल्या संपूर्ण चर्च मंडळी सोबत या मोर्चामध्ये सक्रीय सहभागी झाले होते.
सदर मोर्चामध्ये लोयोला चर्च श्रीरामपूर, सेंट झेवियर चर्च टिळकनगर, संत तेरेसा चर्च हरेगाव, ऑल पास्टर्स फेलोशिप श्रीरामपूर, न्युज लाईफ पास्टरर्स व रेव्ह.फेलोशिप श्रीरामपूर, अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ, महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद, मेथाडिस्ट चर्च ,सेव्हन्थ डे चर्च ,सर्व्हेशन आर्मी ,राष्ट्रीय ख्रिस्ती आघाडी , संत लूक हॉस्पिटल ,कानोसा हॉस्टेल , टिळक नगर सिस्टर श्रीरामपूर इ.चर्चचे धर्मगुरू व संघटना सहभागी झाल्या होत्या.
याप्रसंगी विविध संघटनांनी एकत्र येऊन बॅनर पोस्टर्स घेऊन मुकमोर्चात सहभागी होते.लोयोला सदनचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.ज्यो.गायकवाड, रे.फा.संपत ओहोळ, रे.फा.टायटस, टिळकनगर येथील रे.फा.मायकल वाघमारे,, रे.फा.संजय पठारे, संत तेरेजा हरेगाव येथील प्राचार्य रे.फा.डाॅमानिक रोझारिओ
दिव्यवाणीचे रे.फा.अनिल चक्रनारायण, डि पाॅलचे धर्मगुरू रे.फा.थाॅमस,, पा.राजेश कर्डक,, पा.आण्णा अमोलीक,, पा. सतिश आल्हाट,, पा. विजय खाजेकर,, पा.रावसाहेब त्रिभुवन, पा.सचिन चक्रनारायण, पा. पीटर बनकर ,योसेफ खंडागळे.,पा.सुभाष खरात,, पा.योगेश ठोकळ,,पा.अशोक त्रिभुवन, बिशप अविनाश सोनवणे, सॅल्वहेशन आर्मीचे कॅप्टन बाळु निकाळजे, मेजर बबन बोर्डे, मेथाॅडीस्ट चर्च चे अॅड ज्योस्ना कदम, सेंट जॉन बॅप्स्टीस्ट चर्च चे अॅड आर डी भोसले, अॅड प्रदीप सिंग सर्व व ऑल पास्टर फेलोशिप सर्व पाळक या मुकमोर्चामध्ये सहभागी झाले होते.
मोर्चा मार्गक्रमण असताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे व मदर तेरेसा इत्यादी महापुरुषांच्या प्रतिमेस फादर व पास्टरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
प्रांत कार्यालयासमोर मोर्चा नेला असताना त्या ठिकाणी फादर ज्यो गायकवाड पास्टर राजेश कर्डक,पा. रावसाहेब त्रिभुवन , ख्रिस्ती सेनेचे अध्यक्ष प्रवीण राजे शिंदे,महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले व सालोमन गायकवाड, अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष राजेश दादा थोरात, पास्टर शमुवेल साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक सरचिटणीस दीपक साठे, रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत केदारी ,वंचित बहुजन आघाडीचे चरण त्रिभुवन ,अहमदनगर शिवसेना उपशहर प्रमुख चंद्रकांत उजागरे
तसेच श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदीक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर,मुस्लिम समाजाचे मौलाना शहर काजी अकबर अली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष लकी सेठी, आरपीआयचे प्रमुख भीमा बागुल एडवोकेट जोस्ना कदम आदींनी भाषणे करून पाठिंबा दिला.
खालील संघटनेने जाहीर पाठिंबा दिला.
कोपरगाव तालुका ख्रिस्ती समाज संघटना. श्रीरामपूर तालुका काँग्रेस कमिटी ,बामसेफ संघटना ,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बहुजन क्रांती औरंगाबाद पास्टर फेलोशिप, बामसेफ बहुजन क्रांती मोर्चा, महाराष्ट्र ख्रिश्चन वेल्फेअर असोसिएशन आणि राष्ट्रीय मराठी ख्रिस्ती संघटना, यावा शामा चर्च पुणे , आरपीआय आठवले गट महेंद्र त्रिभुवन, विजय पवार आरपीआयचे व नगरसेवक प्रकाश ढोकणे,नाशिक बिशप हाऊस तर्फे वॉल्टर कांबळे, विविध अशा संघटनांनी ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला.
शीख समाज , मुस्लिम समाज , विविध राजकीय पक्षाचे नेते यांनी जाहीर पाठिंबा दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाकर पंडित यांनी केले
सदरचा मोर्चा शांततेत यशस्वी करणे कामी फादर गायकवाड पा राजेश कर्डक,पा रावसाहेब त्रिभुवन,पा अलिषा अमोलिक,पा. सतीश आल्हाट पा.पिटर बनकर पा सुनील बारसे,पा योसेफ वडागळे, पा.विजय खाजेकर पा सचिन तुपलोढे सल्वहेशन आर्मीचे कॅप्टन निकाळजे,मेजर बोर्डे पा सचिन चक्रनारायण,पा अण्णासाहेब अमोलिक
तसेच पॅरिस कौन्सिलचे सेवक प्रतिनिधी कमलाकर पंडित,महाराष्ट्र ख्रिस्ती विकास परिषदेचे दीपक कदम उद्योजक अविनाश काळे, ख्रिस्ती सेनेचे प्रवीण राजे शिंदे, अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे शेळके सर , ब्रदर श्रीकांत बोर्डे, रेव्ह राजेश शिंदे, पा चेतन साथ दिवे, पा. अशोक त्रिभुवन, पा. विशाल शेलार, पा. पेत्रस पंडित सिस्टर नलिनी आल्हाट,तसेच ख्रिस्ती समाजाचे अनेक कार्यकर्ते व ऑल पास्टर फेलोशिपचे पास्टर, न्यू लाईफ पास्टर्स अँड रेव्ह फेलोशिपचे पास्टर आदींनी मोर्चा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.ख्रिश्चन धर्मगुरूवर होणारे हल्ले व धर्मांतराच्या नावाखाली होणारी विनाकारण बदनामी निषेधार्थ सकल मुकमोर्चा मुळे शासना पर्यंत संदेश शांततेत यशस्वीपणे पोहचविला गेला.
I am a retired as Craft Instructor from Govt. I. T. I. Shrirampur, state government Employed. Now Reporter of BPS Live news Shrirampur, Ahmednagar, Maharashtra since Dec. 2021.