ग्रामपंचायत निवडणुकिस इच्छुक उमेद्वारांसाठी खळबळजनक बातमी, गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्या अतिक्रमण धारक उमेद्वारांचे अर्ज होणार बाद .

ग्रामपंचायत निवडणुकिस इच्छुक उमेद्वारांसाठी खळबळजनक बातमी, गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्या अतिक्रमण धारक उमेद्वारांचे अर्ज होणार बाद .

ग्राम पंचायत निवडणुकीत अतिक्रमण धारकांचे अर्ज होणार बाद .

 

       

           निवडणुक आयोगाचे निर्देशानुसार राज्यभरातील जवळपास २ हजार ३५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यकम जाहीर झाला असुन ५ नोव्हेबर २०२३ रोजी मतदान होणार आहे . या सोबतच राज्य भरातील २ हजार ९५० सदस्य पदाच्या व १३० सरपंच पदाच्या ही पोट निवडणुका चालु आहेत तर राज्य भरातुन लोक नियक्त सरपंचांच्या निवडणुक होणार आहे . यातच अनेक गावातील ग्रामस्थांनी स्वतः साठी तर काहींनी कारभारनीं साठी अर्ज दाखले केले आहेत .

 

 

           ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ज ३ प्रमाणे ग्रामपंचयतीच्या सदस्याने अगर उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेद्वारांनी अगर त्यांच्या कुटुंबातील वारसांनी अतिक्रमण केलेले निदर्शनास आणून दिल्यास अशा व्यक्ती त्या पदासाठी व उमेदवारी साठी अपात्र ठरतील . ग्राम पंचायत अधिनियम कायदा ग्रामविकास मंत्रालयाच्या सर्वोच्य न्यायालयाचा निर्णयानुसार अशा व्यक्तीच्या अतिक्रमणाबाबत ग्रामपचायत क्षेत्रातील सरकारी जमीनीवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करणारा व्यक्ती हा अपात्र ठरतो .

 

       

              अशा व्यक्ती किंवा त्याचे कुटुंबीयांनी पदधारण करण्यापुर्वी असणाऱ्या काळातील असेल तरीही अशी व्यक्ती अपात्र ठरू शकते . केलेले अतिक्रमण कायम असेल तर अशा व्यक्तींच्या वारसांनाही हा नियम लागू ठरतो . महीलांचेही विवाहापुर्वी झालेले अतिक्रमण ही ग्रामपचायत पदासाठी अपात्र ठरवीण्यात आले आहे वरिल निकषांवर अतिक्रमण केलेल्या अशा व्यक्ती विरुद्ध फौजादारी गुन्हा दाखल होऊ शकतो . यामुळे राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अतिक्रमण धारक उमेद्वारांच्या अर्जांवर शासंकता निर्माण झाली असून अशा उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही .

 

 

          महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ ( १ ) (J - 3 ) नुसार ज्या व्यक्तिने शासकिय जमिनीवर किंवा मालमतेवर अतिक्रमण केले आहे अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकत नाही . त्यामुळे अतिक्रमण धारक उमेद्वारांचे अर्ज बाद होणार असल्याने ग्रामपंचायत निवडणूक लढण्यास गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्या उमेद्वारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे .