तालुकास्तरीय पीक स्पर्धेमध्ये पिंप्री अवघड येथील प्रगतशील शेतकरी श्री .अशोक गटकळ यांना मिळाले प्रथम क्रमांकाचे विजेतेपद .

तालुकास्तरीय पीक स्पर्धेमध्ये पिंप्री अवघड येथील प्रगतशील शेतकरी श्री .अशोक गटकळ यांना मिळाले प्रथम क्रमांकाचे विजेतेपद .

*तालुकास्तरीय पिक स्पर्धे मध्ये पिंप्री अवघड येथील प्रगतशील शेतकरी अशोक गटकळ यांना प्रथम क्रमांकाचे विजेतेपद* -

           तालुका कृषी विभाग राहुरी यांनी रब्बी हंगामामध्ये गहू पिकाचे पीक स्पर्धा मध्ये शेतकऱ्यांना सहभाग घेण्याचे आवाहन केले होते ,त्यानुसार तालुक्यातून सहभाग घेतलेले शेतकरी यांचे पीक पक्व झाल्यावर काढण्याच्या वेळी नेमून दिलेले पर्यवेक्षण अधिकारी यांचे निरीक्षणाखाली ,पीक कापणी प्रयोगानुसार उत्पादनाची आकडेवारी नोंदविण्यात आली. त्यामध्ये तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पिंप्री अवघड येथील प्रगतिशील शेतकरी श्री अशोक रामदास गटकळ यांना देण्यात आले. पंचायत समिती येथे घेण्यात आलेल्या कृषी दिन कार्यक्रमात मा.श्री रवींद्र आढाव ,माजी उपसभापती यांच्या हस्ते श्री अशोक गटकळ यांना शाल ,श्रीफळ व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, कृषी अधिकारी श्रीमती पौर्णिमा गाढे, श्री गिरगुणे साहेब , श्री अनारसे साहेब तसेच कृषी विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी, प्रगतशील शेतकरी, कृषी सेवा केंद्राचे चालक ,पंचायत समिती येथे कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.

           श्री .अशोक गटकळ यांनी श्रीराम 111 या संकरित जातीचे गहू बियाण्याची पेरणी केलेली होती त्यामध्ये जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया ,रासायनिक खतांचे योग्य व्यवस्थापन ,फवारणी द्वारे 19:19:19 व 0:52:34 तसेच पिक संरक्षक औषधांचा वेळेत वापर केल्यामुळे त्यांना 29 क्विंटल प्रति एकर असे उच्चतम उत्पादन मिळाले. या साठी कृषी विभागा कडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले असे श्री अशोक गटकळ यांनी सांगितले. 

             पर्यवेक्षण अधिकारी म्हणून- श्री रामदास बुचडे तंत्र अधिकारी (विभागीय कृषी सहसंचालक पुणे) , श्रीमती विनया बनसोडे (मंडळ कृषी अधिकारी वांबोरी), कृषी पर्यवेक्षक श्री रानू आंबेकर यांनी कामकाज पाहिले.

              यामध्ये पीक कापणी प्रयोग, प्लॉटची लांबी रुंदी, मापे घेणे इत्यादी साठी कृषी सहाय्यक श्री सोन्याबापु बाचकर, श्री भीमभाऊ गडदे श्री बाळासाहेब सुळ यांनी कामकाज पाहिले. , श्री अशोक रामदास गटकळ यांना पिक स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेतेपद मिळाल्यामुळे पिंप्री अवघड ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त  केला असून सर्वांनी श्री .अशोक गटकळ यांना शुभेच्छाही दिल्या आहेत .