धनगरवाडी येथील ४० वर्षांपासून बंद असलेला रस्ता झाला खुला.

धनगरवाडी येथील ४० वर्षांपासून बंद असलेला रस्ता झाला खुला.

धनगरवाडी येथील ४० वर्षांपासून बंद असलेला रस्ता झाला खुला. सोन‌ई (वार्ताहर ) दि २. सोन‌ई जवळील धनगरवाडी येथे ४० वर्षापासून वादात पडलेल्या रस्ता सामजशाने व दोन्ही बाजुचे शेतकरी एकत्रीत बसवुन दोन्ही बाजुचे ऐकुन घेऊन त्यावर सर्वांच्या सहमतीने तोडगा काढुन रस्त्याचा प्रश्न सोडविला या रस्त्याचा गेल्या चाळीस वर्षापासूनच्या वाद होता रस्त्याचा प्रश्न नेवासा तहसीलदार यांनी दोन्ही बाजूला मान्य होईल असा तोडगा काढुन वाद मिटविला व लगेचच रस्त्यावर भराव टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली शासनाच्या आदेशानुसार रस्ता खुला करण्याचे आदेश पारित केले होते त्यानुसार धनगरवाडी येथील हा रस्ता वादात वाहतुकीस बंद होता आता रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्याने धनगरवाडी परिसरातील दातीर, भागवत ,विरकर वस्ती वरील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे यावेळी घोडेगाव येथील सर्कल श्रीमती सीमा देवी देठे मॅडम धनगरवाडीचे कामगार तलाठी श्रीमती दिपाली मेहर,पोलीस पाटील भाऊसाहेब थोरात सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील विरकर यांच्या उपस्थिती खुला करण्यात आला यावेळी सखाराम डफाळ, बाळासाहेब विरकर, संजय विरकर, गोरक्षनाथ कातोरे,धगरवाडीचे उपसरपंच गणेश दातीर त्याच बरोबर तंटा मुक्तीचे सदस्य व धनगरवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते गेल्या चाळीस वर्षापासूनच्या रस्त्याचा वाद मिटवण्यात प्रशासनाला यश आले चार जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर भरावा राखण्याचे काम सुरू करण्यात आले आहे