*अहिल्यानगर जिल्ह्याची जिवनदायीणी असणाऱ्या मुळा धरणाचे पाणी पैठण धरणाला सोडणे थांबवा च्या आन्दोलकांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता*
आहिल्यानगर जिल्ह्याच्या हितासाठी मुळा डॅम ( ज्ञानेश्वर सागर ) चे पाणी अतिशय उपयोगी असल्याने आपल्याजवळचे पाणी बाहेर न जाऊ देता त्याचा उपयोग हा प्रथम स्थानिकांनाच झाला पाहिजे अशा लोकहिता करीता सन २०१२ मध्ये आमदार शिवाजी कर्डीले, माजी खासदार प्रसाद तनपुरे,कै. शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वा खाली मोठे जन आन्दोलन करण्यात आले या आन्दोलनात सहभागी झालेल्या सर्व नेत्यांना पोलिसांनी अटक केली होती आज अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायाधिश शेख साहेब यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्ततेचा निकाल दिला.
या खटल्यात ॲड.महेश तवले,व ॲड. जालिंदर ताकटे,यांनी प्रभावीपणे बाजु मांडली
निदोष मुक्त झालेल्यांमध्ये आमदार शिवाजी कर्डीले,माजी खासदार प्रसाद तनपुरे,माजी आमदार चंद्रशेखर कदम,सुरेंद्र थोरात,रविंद्र मोरे,रावसाहेब या.तनपुरे,सिताराम ढूस,चांगदेव भोंगळ,आसाराम ढूस, सोन्याबापू जगधने,डॉ.जयंत कुलकर्णी,प्रविण लोखंडे,नितिन तनपुरे,दत्ता जोगदंड,भाऊसाहेब कांबळे,तान्हाजी धसाळ,सर्जेराव घाडगे,सुर्यभान गाडे,विजय डौले, शहाजी कदम,यांचे सह या आन्दोलनातील इतर आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.








