महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त पाणलोट क्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न .

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त पाणलोट क्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न .

*महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त पाणलोट क्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न .

         महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त पाणलोट क्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे यांनी वृक्ष लागवड हा केवळ एक दिवसीय कार्यक्रम न राहता आयुष्यभर राबवावा असा संदेश दिला.

            याप्रसंगी विद्यापीठातील आदर्श गाव योजनेअंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या पाणलोट क्षेत्रात आवळ्याची 100 रोपे व बेहड्याची 100 रोपांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. सचिन नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. कैलास कांबळे व क्रीडा अधिकारी श्री. वैभव बारटक्के यांनी केले. या वृक्षारोपण कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.