*श्रीरामपूर:-- शहरात रस्त्यांवर फिरणाऱ्या गोमातांचे प्रशासनाने तात्काळ "लम्पीरोग" प्रतिबंधक लसीकरण करावे:--भाजपा युवा मोर्चा*
श्रीरामपूर:- दि. २५/११/२०२२:सध्या जिल्ह्यासह राज्यात गायी व म्हशींमध्ये "लम्पी"आजाराचा मोठा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. श्रीरामपूर शहरामध्ये विविध ठिकाणी, प्रमुख रस्त्यावर फिरणाऱ्या गायांमध्ये लम्पीच्या आजाराचे लक्षणं आढळून आलेले आहे. तरी या सर्व जनावरांचे प्रशासनामार्फत लसीकरण करण्यात यावे व येणाऱ्या काळातील लम्पीसारख्या आजारापासून गोमातेचे संरक्षण करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली.
यावेळेस भायूमो शहराध्यक्ष रुपेश हरकल यांनी शहरामधील फिरणाऱ्या लम्पी आजारापासून त्रस्त असणाऱ्या गोमतांचे छायाचित्रे मा.तहसिलदार श्री. प्रशांत पाटील साहेब यांच्या निदर्शनात आणून दिले.त्यावेळी मा. तहसिलदार साहेबांनी तात्काळ निवेदनाची दखल घेऊन पशुधन विकास अधिकारी डॉ. कोते यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला व त्यासोबतच मा. मुख्याधिकारी साहेबांनाही तात्काळ लक्ष देण्याबाबत सूचना केली. यावेळेस भाजयुमो शहराध्यक्ष रुपेश हरकल, आरंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश ओझा, जिल्हा सचिव राहुल आठवल, सुबोध शेवतेकर, ता.उपाध्यक्ष लखन उपाध्ये, अक्षय धुमाळ, रुद्रप्रताप कुलकर्णी, विशाल रुपनर, उपाध्यक्ष किरण रक्ते, सचिव पंकज करमासे, सुजित तनपुरे, महेश बिरदौडे, प्रथमेश जोशी, कुणाल आठवल, आदी पदाधिकारी उपस्थित होते.









