देडगाव येथे उद्या १९ रोजी वै .वानर राजा यांच्या स्मरणार्थ उत्तरांग तीथी चे आयोजन.

देडगाव येथे उद्या १९ रोजी वै .वानर राजा यांच्या स्मरणार्थ उत्तरांग  तीथी चे आयोजन.

देडगाव येथे उद्या १९रोजी वै.वानर राजा याच्या स्मरणार्थ उत्तरांग तिथीचे आयोजन

नेवासा तालुका (प्रतिनिधी युनूस पठाण)

      नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे वै.वानर राजाच्या स्मरणार्थ उद्या मंगळवार दिनांक १९ रोजी भव्य उत्तरांग तिथीचे आयोजन करण्यात आले आहे .

      गेल्या काही दिवसांत गावात अतिशय गुणी, गरीब हनुमंत रुपी वानर राहत होते. भाविक त्याचे मनोभावे दर्शन घेत होते.दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले. संबंध गावकऱ्यांनी जड अंत:करणाने टाळ मृदुंगाच्या गजरात, आरती, हनुमान चालीसा अशा विविध धार्मिक कार्यक्रमाने अत्याविधी करत त्यांना हनुमान मंदिर परिसरात निरोप दिला.

        त्यामुळे वै.वाणर राजा याच्या स्मरणार्थ ह भ प रामायणाचार्य सोमेश्वर महाराज गवळी (वैष्णव आश्रम बऱ्हाणपूर) यांच्या वेळ ९ते ११ वाजता. हनुमान मंदिर समोर कीर्तनाने भव्य उत्तरांग तिथी चे आयोजन करण्यात आले आहे.

       या कार्यक्रमासाठी गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज (श्री.क्षेत्र देवगड),महंत ह भ प देविदास महाराज म्हस्के (श्री क्षेत्र ज्ञानेश्वर संस्था नेवासा), महंत गुरुवर्य सुनीलगिरी महाराज (श्रीराम साधना आश्रम मुकिंदपुर रामनगर ),गुरुवर्य महंत स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज उत्तराधिकारी (श्री.क्षेत्र देवगड), व देडगावच वैभव ह भ प, गाथामूर्ती सुखदेव महाराज मुंगसे उपस्थित संपन्न होणार आहे. कार्यक्रमानंतर एकादशी फराळ होईल.

       या भव्य उत्तरांग तीथी साठी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित रहावे. अशी विनंती समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ देडगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे.