नेवासा पोलीस व सायबर टीमची धडाकेबाज कारवाई.
श्रीरामपूर सायबर पोलिस पथकाच्या मदतीने ऊस तोडणी कामगारांचे मोबाईल चोरणारा चोर नेवासा पोलिसांकडून अटक
सविस्तर वृत्त असे की दि ०४-०१-२०२२ रोजी बेलपिंपळगाव तालुका नेवासा येथे ऊस तोडणीसाठी आलेल्या अकाश राठोड या ऊस तोडणी कामगाराने नेवासा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीनुसार दि ०२-०१-२०२२ मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी १४००० रुपये किमतीचे तीन मोबाईल ऊस तोडणी कामगारांच्या कोप्यातून चोरून नेल्याची फिर्याद अकाश राठोड यांनी दिली . सदर बाब लक्षात घेता नेवासा पोलिसांनी गुरनं१२/२०२२ भा. द .वि 3७९ दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास अप्पर पोलिस निरीक्षक सो श्रीरामपूर पोलीस यांच्याकडील सायबर मदतीने माहिती प्राप्त करून पुराव्याच्या आधारे तपास करून आरोपी समीर भाऊसाहेब भोसले वय(२०)राहणार मुकींदपुर नेवासा यास अटक करण्यात आले. त्याच्याकडून नंबर नसलेली पल्सर मोटर सायकल सह चोरीस गेलेले तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सदरची परिस्थिती पाहता आरोपीकडून अशा प्रकारचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक अहमदनगर मनोज पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अहमदनगर अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे मॅडम श्रीरामपूर, मा उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे शेवगाव, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर समाधान भाटेवाल,पोना बबन तमनर,पोना बबन कुदळे, पोकॉ अंबादास गीते, पो कॉ केवल राजपूत, पो कॉ योगेश आव्हाड, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांचे सायबर टीमचे पोना फुरकान शेख, प्रमोद जाधव यांनी केली आहे.