बालाजी देडगाव येथे संत सावता महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उदयन दादा गडाख यांची सदिच्छा भेट.
बालाजी देडगाव:-
( प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे तांबे वस्ती येथे श्री संत सावता महाराज व विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष उदयन दादा गडाख यांनी सदिच्छा भेट दिली.
मूर्ती स्थापना, कलश रोहन, पूर्णाहुती महाआरती व सप्ताहाची सुरुवात होणार असून या निमित्ताने मोठ्या होम हवनाचे नियोजन केले आहे तरी या होमाचे माननीय उदयन दादा गडाख यांनी दर्शन घेऊन या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला नामदार शंकरराव गडाख मित्र मंडळ च्या वतीने म्हणाले की अतिशय सुंदर मंदिर व देखील मूर्तीचे आयोजन केले आहे या देवस्थानला पाहून अतिशय मन प्रसन्न होते या सर्व सोहळ्याला भरभरून शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री संत सावता महाराज देवस्थानच्या वतीने मा. उदयनदादा गडाख यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मुळा एज्युकेशन संस्थेचे सदस्य शिक्षण भूषण बाजीराव पाटील मुंगसे ,खरेदी विक्री संघाचे माजी संचालक कडूभाऊ तांबे, जनार्दन तांबे, सोपानराव तांबे, देवस्थानचे अध्यक्ष अशोक तांबे, बालाजी पाणी वाटप संस्थेचे चेअरमन संतोष तांबे, सोनई चे युवा नेते विकास राजळे ,गणेश भाऊ लोंढे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे पत्रकार युनूस पठाण, सोसायटीचे संचालक जनार्दन देशमुख, युवा नेते महेश चेडे, पिंटू तांबे, अशोकराव तांबे , शिवनेरी ग्रुपचे अध्यक्ष हिरामण फुलारी, युवा नेते आशिष हिवाळे, वसंत मुंगसे, प्रवीण मुंगसे सर व आदी ग्रामस्थ,देवस्थानचे सर्व विश्वस्त व आदी तरुण मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.