शिवशंभु विचारांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या तरुणास पोलिसांकडून मारहाण, PSI वर कारवाईची मागणी.

शिवशंभु विचारांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या तरुणास पोलिसांकडून मारहाण, PSI वर कारवाईची मागणी.

शिवशंभु विचारांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या तरुणास पोलिसांकडून मारहाण, PSI वर कारवाईची मागणी.


प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_9370328944.

सविस्तर_अकोला जिल्ह्यातील लोहारा येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दोन तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मोबाईल वर व्हॉट्सअँप स्टेटस ठेवले होते. या स्टेटसमुळे विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत, उरल येथील PSI गोपाल ढोले यांनी या तरुणांना बेकायदेशीर मारहाण केली आहे.


शिवशंभु विचारांचा प्रचार-प्रसार करणं गुन्हा आहे का?

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात ज्यांनी रयतेचे राज्य निर्माण केलं, ज्यांनी धर्मासाठी, स्वराज्य रक्षणासाठी बलिदान दिलं त्या शिवशंभु विचारांचा प्रचार-प्रसार करणं गुन्हा आहे का?


पोलिस अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी.

सदर शिवप्रेमी तरुणांना विनाकरण मारहाण होणे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळें मा.मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी संबधित दोषी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे, त्यामुळें भविष्यात शिवशंभु विचारांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या निरपराध तरुणांना अशा प्रकारे मारहाण करण्याचे धाडस करण्याची हिमंत कोणताही पोलिस अधिकारी करू शकणार नाही.