संविधान बचाओ एक दिवसिय घंटानाद आन्दोलन राहुरी तहसिल समोर उद्या दि. ६. सप्टेंबर २०२२ रोजी वंचित बहुजन आघाडीचे .. ..
⚡भारतिय संविधनाच्या रक्षणाकरीता आम्ही आहोत सदैव मैदानात.⚡
विद्यमान भारतिय संविधानाशी विद्रोह करुन हिंदू राष्ट्राचे संविधान लिहीन्याची जबाबदारी देणाऱ्या कथीत व्हीडीओ मधील व्यक्तींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत आणी हा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल करणाऱ्या ग्रुप अॅडमिनवर योग्य ती कठोर कारवाही करून गुन्हा दाखल करण्यात यावा या बाबत राहुरी तहसिल कार्यालया समोर उद्या दि.०६ सप्टेंबर २०२२ रोजी वंचित बहुजन आघाडीचे एक दिवसीय घंटानाद आन्दोलन करणार असल्याचे निवेदन आज राहुरीचे तहसिलदार श्री शेख साहेब यांचे मार्फत देशाच्या राष्ट्रपती माननिय दौपदी मुर्म भारत सरकार राष्ट्रपती भवन यांना देण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर जिल्हा महासचिव अनिल जाधव. जिल्हा महीला अध्यक्षा वर्षाताई बाचकर.राहुरी ता.अध्यक्ष संतोष चोळके. तालुका महासचिव संदीप कोकाटे.राहुरी शहर अध्यक्ष पिंटुनाना साळवे. देवळाली शहर अध्यक्ष साईनाथ बर्डे.देवळाली उपाध्यक्ष नानासाहेब उंडे.आशोक मुसमाडे सह कार्यकर्ते यावेळी उपस्थीत होते. .. .