सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राहुरी येथे *स्विप राहुरी* अंतर्गत मतदान जनजागृती,मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी केले पथनाट्य सादर .

सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राहुरी येथे *स्विप राहुरी* अंतर्गत मतदान जनजागृती,मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी केले पथनाट्य सादर .

*राहुरी स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती*

            सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय, राहुरी येथे स्वीप राहुरी अंतर्गत, मतदान जागृतीसाठी व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी, लोकांमध्ये मतदानाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी, लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, राहुरीचे विद्यार्थी ओम जाधव, सत्यम कटारे, अनुजा कराळे, वैष्णवी भंडारे, शिवानी कळमकर, सृष्टी शेटे, विश्वास गावडे, सानिका कुसमुडे यांनी लोकजागृतीसाठी पथनाट्य सादर केले. यावेळी त्यांनी विविध घोषणा व प्रबोधनपर गीतांतून जनजागृतीचे आव्हान केले.

           मतदान करणे म्हणजे लोकशाही टिकवणे, मतदान करणे म्हणजे देशाचे भविष्य घडविणे, असा संदेश त्यांनी पथनाट्यातून दिला. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. राहुरी स्वीप नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी मोहिनीराज तुंबारे, समन्वयक विस्ताराधिकारी सिनारे मॅडम व सातपुते मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहिरे, उपप्राचार्य बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा, प्रा.संदिप जाधव हे उपस्थित होते. राहुरीचे तहसीलदार, नायब तहसीलदार व इतर सदस्यांनी यासाठी मोलाचे सहकार्य केले. महाविद्यालयातील स्वीप सदस्य प्रा.पंकज घोलप व प्रा.अनिरुद्ध जाधव हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.