खडांबे येथील सोसायटीच्या निवडणुकीत जनविकास मंडळाचा दणदणीत विजय .

* खडांबे सोसायटी जनविकास मंडळाच्या ताब्यात
राहुरी तालुक्यातील खडांबे बुद्रुक विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक,कृषिभूषण श्री सुरसिंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी सरपंच श्री यशवंतराव रामदास ताकटे यांच्या नेतृत्वाखालील जनविकास मंडळाने १३ पैकी ११ जागा जिंकून बहुमत मिळवले आहे..
खडांबे संस्थेच्या निवडणुकीत कर्जदार मतदारसंघातून अमोल जयसिंग पवार, सुदर्शन आबासाहेब काचोळे, राधाकृष्ण निवृत्ती जठार,दत्तात्रय नामदेव ताकटे, ज्ञानेश्वर पंढरीनाथ ताकटे, बाबासाहेब भागुजी तांबे तर विरोधी गटाच्या वतीने विलास रामभाऊ कल्हापुरे व दिलीप नानासाहेब जठार निवडून आले. अनुसूचित जाती / जमाती मतदार संघ रावसाहेब लालाजी पवार, महिला मतदारसंघातून सुनंदा दौलत जाधव व लीलाबाई भागवत ताकटे इतर मागासवर्ग प्रतिनिधी मतदारसंघातून रुचिरा जयसिंग पवार व भटक्या जाती जमाती मागास प्रवर्ग मतदारसंघातून शारदा अशोक थोरात विजयी झाल्या आहेत.