राष्ट्रीय वयोश्री योजना वृद्ध नागरिकांसाठी आधार -आप्पासाहेब दुस ( प्रहार )
*शासन आपल्या दारी..*
*राष्ट्रीय वयोश्री योजना वृद्ध नागरिकांसाठी आधार* - आप्पासाहेब ढुस, प्रहार
गरजूवंत व गरीबीच्या रेषेखालील वृद्ध नागरिकांसाठी केंद्राने राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू केली आहे. त्यामध्ये वृद्ध नागरिकांना आत्मनिर्भर बनविणे हा मुख्य हेतू आहे. त्यामध्ये मोफत तीन चाकी सायकल व अन्य सहाय्यक उपकरणे आहेत.
हा लाभ योजनेतील पात्र लाभार्थींना मिळतो. त्यासाठी ज्या
वृध्द नागरिकांना या राष्ट्रीय वयोश्री योजनेतील या साहित्याची आवश्यकता आहे त्यांनी केंद्र शासनाच्या ALIMCO Portal या अधिकृत पोर्टल च्या www.alimco.in या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करावयाचे आहेत.
राष्ट्रीय वयोश्री योजना मध्ये अर्ज करणेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असेल व नागरिकांना काय लाभ मिळतील, त्याची पात्रता, आवश्यक कागदपत्रे याबद्दल सर्व माहिती या पोर्टलवर उपलब्ध आहे.
या योजनेतून वृद्ध नागरिकांना मोफत व्हीलचेयर, ट्राइपॉड्स, चालणेची काठी आदि बऱ्याच आवश्यक व सहायक उपकरने वृद्ध नागरिकांना ऑनलाइन अर्ज केल्यावर घरबसल्या मोफत मिळतात. ज्याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करते.