शिक्षण भूषण बाजीराव पाटील मुंगसे यांचा सहसचंद्रदर्शन सोहळा व जमीन दान देणारे यांचा कृतज्ञता सोहळा 2022 मोठ्या उत्साहात संपन्न.

शिक्षण भूषण बाजीराव पाटील मुंगसे यांचा सहसचंद्रदर्शन सोहळा व जमीन दान देणारे यांचा कृतज्ञता सोहळा 2022  मोठ्या उत्साहात संपन्न.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये बालाजी देडगाव येथे शिक्षणभूषण बाजीराव शंकरराव पाटील मुंगसे (अण्णा )यांचा सहसचंद्रदर्शन सोहळा (अभिष्टचिंतन सोहळा) व गावात व वाड्यावर शाळेला जमीन दान करणाऱ्या मान्यवरांचा तीर्थ मूर्ती कृतज्ञता सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

        सकाळी या सन्मान सोहळ्या चे सन्मान मूर्ती यांच्या हस्ते बालाजी मंदिर येथे अभिषेक व आरती करण्यात आली .नंतर लगेचच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव येथे स्मार्ट क्लास रूम मध्ये स्मार्ट बोर्डचा लोकार्पण सोहळा( उद्घाटन )करण्यात आले.

       या लोकार्पण सोहळ्यानंतर या सन्मान मूर्तीचा व आलेल्या प्रमुख मान्यवरांचा फटाक्याच्या आतषबाजी मध्ये व पारंपरिक कला असणारा कैलास घोरपडे यांचा वीरभद्र ब्रास बँड यांनी लोककला सादर करत भरमसाठ गाण्याची आतषबाजी व राजशाही थाटात नगाऱ्याच्या शाही आवाजात ही मिरवणूक गावभर अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय पर्यंत मोठ्या उत्साहात पार पडली.

      यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मा. खासदार यशवंतरावजी गडाख साहेब ,माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब व कृतज्ञता सोहळ्याचे सन्मान मूर्ती व मा.बाजीराव पाटील मुंगसे या सर्व प्रतिष्ठित मान्यवरांचे अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. अहिल्याबाई होळकर शाळेत बाजीराव पाटील मुंगसे यांच्या हस्ते वृक्षारोपण ही करण्यात आले.

         मा. बाजीराव पाटील मुंगसे यांचा सहसचंद्रदर्शन सोहळा व जमीन दान करणाऱ्या चा तीर्थ मूर्ती सोहळा अहिल्याबाई होळकर शाळेत पार पडला . हा सोहळा जेष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या व्यासपीठावरील कार्यक्रमाचे स्वागत देडगावचे  चंद्रकांत पाटील मुंगसे यांनी केले.

      यावेळी प्रथम माजी खासदार यशवंतराव गडाख साहेब यांचा माजी विद्यार्थी संघ व ग्रामस्थांच्या वतीने व अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यानंतर शिक्षण भूषण बाजीराव पाटील मुंगसे यांच्या जोडीचा सन्मान करण्यात आला व गावात वस्ती शाळा वर जमीन दान देणाऱ्या साहेबराव कदम, लक्ष्मणराव बनसोडे ,नामदेवराव तांबे, बाबासाहेब तांबे, सोन्याबापू कुटे, द्वारकाबाई मुंगसे ,सुंदर दास मुंगसे, कमलाकर गोयकर , कळुरम गोयकार,मोतीलाल आदमने, गोरक्षनाथ नांगरे , संजय कदम ,सागर बनसोडे यांचा सपत्नीक ज्येष्ठ साहित्यिक यशवंतरावजी गडाख साहेब व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यानंतर प्रमुख मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नवनाथ फुलारी सर यांनी केले तर त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव घाडगे पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मणराव बनसोडे , ज्येष्ठ दानशूर व्यक्तिमत्व बाजीराव पाटील मुंगसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

       यावेळी ज्येष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख साहेब म्हणाले की बाजीराव पाटील मुंगसे हे तत्त्वनिष्ठ व एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत .आयुष्यभर राजकारण कमी व समाजकारण जादा करून या गावामध्ये ज्ञानाचं विद्यापीठ उभारण्यास मोठा सिंहाचा वाटा उचलला .माणूस जरी भोळा भाबडा असला तरी अतिशय या गावामध्ये उत्तम प्रकारचं काम केलं. सर्वजण गट तट विसरून या शाळेत आल्याबद्दल सर्वांचे कौतुकही केलं व माजी विद्यार्थी संघाने केलेल्या कामगिरीचा अभिनंदन करत बाजीराव पाटील मुंगसे यांना पुढील आयुष्याच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.

         यावेळी नेवासाचे सभापती रावसाहेब कांगूने, मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, व्हाईस चेअरमन कडू पाटील कर्डिले ,ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक प्रा. नारायणराव मस्के, शिवाजी दादा भुसारी, नारायणराव लोखंडे ,लक्ष्मणराव काळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र पाटील मस्के, काशिनाथ आणा नवले, अशोक कारखान्याचे संचालक पोपटराव जाधव ,

तुकाराम मिसाळ, मोहनराव गायकवाड,माजी सभापती भाऊसाहेब पाटील मोटे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अंबादास पाटील कोरडे , माझी उपसभापती कारभारी पाटील चेडे,एकनाथ पाटील कावरे, कुकाना विद्यमान सरपंच अमोल अभंग, जिल्हा परिषद सदस्य तुकाराम पाटील शेंडे ,माजी सभापती अशोकराव मंडलिक, मुळा एज्युकेशनचे प्राध्यापक तुवर सर ,खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रभाकर कोलते, पंचायत समिती सदस्य वैशालीताई एडके, पंचायत समिती सदस्य मीनाताई बाळासाहेब सोनवणे,जिल्हा परिषद सदस्य सविताताई अडसुरे ,माजी सभापती कारभारी जावळे, पंचायत समिती सदस्य अजित पाटील मुरकुटे, शिक्षक बँक संचालक रामेश्वर चोपडे, संतोष मगर ,मुळा कारखान्याची संचालक लक्ष्मण आबा पांढरे, मुळा कारखान्याचे माजी चेअरमन जबाजी पाटील फाटके, दूध संघ संचालक रंगनाथ दादा रौंदळ , ऑड, गोकुळ भताने ,सातवड सोसायटीचे चेअरमन बंडू पाठक ,मुळा पाटबंधारे विभागाचे करंजे भाऊसाहेब ,दरंदले भाऊसाहेब ,माजी पंचायत समिती सदस्य शंकरराव भारस्कर ,माजी सभापती भगवानराव गंगावणे, युवा नेते सलीम राजे शेख, युवा नेते विकास राजळे, गणेश भाऊ लोंढे, रामभाऊ कोलते, काकासाहेब काळे, गोरक्षनाथ घोडेचोर, युवा नेते महेश राजे काळे , संतोष म्हस्के शरदराव शिंदे,लक्ष्मणराव काळे,दशरथ लोंढे सर अध्यक्ष शिक्षण परिषद नेवासा ,वस्ती शाळा शिक्षक संघटना अध्यक्ष भंनगे सर ,रावसाहेब दुशिंग, ज्ञानेश्वर कारखाना सेक्रेटरी रवींद्र मोटे, माजी संचालक ज्ञानदेव पाटील दहातोंडे ,मारोतराव घुले शिक्षण संस्था प्रशासकीय अधिकारी वाबळे सर , अजय मोटे ,एस बी शेटे,सखाराम पाटील लोंढे, कांता मामा दरंदले ,भानदास कावरे, पाचुंदा सोसायटीचे चेअरमन माणिकराव होंडे, युवा नेते अनिल घुले, बबनराव भानगुडे, अड,अण्णासाहेब आंबाडे अड अजय रिंधे, देवगाव सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ निकम, दिनकरराव गर्जे,आदर्श सरपंच, नामदेवराव शेळके,

 सरपंच सौ. स्वातीताई चंद्रकांत मुंगसे ,उपसरपंच लक्ष्मणराव गोयकर ,व सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन महेश कदम व व्हाईस चेअरमन रामभाऊ कोकरे वसर्व संचालक ,बालाजी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे व सर्व विश्वस्त, अहिल्याबाई होळकर शाळेचे प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड व सर्व शिक्षक वृंद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भोसले सर व सर्व शिक्षक वृंद, ,माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, कैलास नाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष राजू कदम व सर्व सदस्य ,बजरंग दलाचे अध्यक्ष सागर मुंगसे व सर्व सदस्य ,दयासागर ग्रुपचे योसेफ हिवाळे, बाबुराव हिवाळे व सर्व सदस्य, शिवनेरी ग्रुपचे हिरामण फुलारी व सर्व सदस्य, नागेबाबा परिवार, जय भवानी युवा मंच, सावता मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य व आदी परिसरातून आलेले मान्यवर व देडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोहळ्यासाठी माजी विद्यार्थी संघ यांनी पुढाकार घेत ग्रामस्थ यांनी त्यांना मोलाचे सहकार्य करत विशेष परिश्रम घेतले.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप नांगरे सर व राजेंद्र कोकरे सर यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार पत्रकार युनूस पठाण यांनी केले.