राहुरी नगरपरिषद मधील व राहुरी तहसील यांच्या हद्दीमधील केलेल्या रस्त्याचे काम अनाधिकृत का अधिकृत याची सखोल चौकशी व्हावी

राहुरी नगरपरिषद मधील व राहुरी तहसील  यांच्या हद्दीमधील केलेल्या रस्त्याचे काम अनाधिकृत का अधिकृत याची  सखोल चौकशी व्हावी
राहुरी नगरपरिषद मधील व राहुरी तहसील  यांच्या हद्दीमधील केलेल्या रस्त्याचे काम अनाधिकृत का अधिकृत याची  सखोल चौकशी व्हावी

राहुरी ता प्रति - डॉ देवेंद्र शिंदे

शहरातील जुन्या पुला शेजारील नावघाट स्मशानभूमी परिसरातील नगरपरिषद अंतर्गत केलेली सौरक्षण भिंत तोडून कमीत कमी सातशे ते आठशे फूट लांबीचा व बारा ते पंधरा फूट रुंदीचा रस्ता बनवण्यात आला आहे.या बाबतीत भिम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन चे जिल्हाध्यक्ष दिपक साळवे यांनी तहसीलदार व नगरपरिषदेला कारवाई चे निवेदन दिले होते .सदर रस्त्या साठी मुरूम व कारगळ वापरण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे हा रस्ता मुळा नदी पात्रातून नावघाट स्मशानभूमी मधून खुरपे मळा इतपर्यंत बनवलेला आहे. रस्ता बनवताना वापरलेली कारगळ व मुरूमाची महसूल विभागाकडून परवानगी घेतली आहे का? व त्याची रॉयलटी भरली आहे का? आणि जर रीतसर पर्वानगी घेतली असेल तर महसूल विभागाने ही कारगळ वापरून नदी पात्रात रस्ता बनवायला परवानगी कशी दिली? असा प्रश्न पडला होता. परंतु सत्य असे आहे की ज्या फिरोज शेख नामक व्यक्तींनी हा रस्ता बनवला आहे त्यांनी राहुरी तहसीलदार व महसूल विभागाची कोणतीही परवानगी घेतली नसून शासनाची फसवणूक केली आहे.सदर चा रस्ता हा बेकायदेशीर आणि अनिधिकृतरित्या वापरलेल्या गौण खनिजाचा असून रस्ता बनवणाऱ्या फिरोज शेख या व्यक्ती ला या बाबतीत विचारणा केली असता काही खोटी माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल केली आहे राहुरी तहसीलदार यांनी मंडळाधिकारी आणि तलाठी यांना पाठवून रस्त्यावर टाकलेल्या मुरूम व कारगळ ची मोजणी देखील केली होती परंतु त्या मुरूमाचे व कारगळ चे ब्रास मध्ये मोजमाप करण्यासाठी राहुरी तहसीलदार साहेब यांनी सार्वजनिक बांधकामं विभागाकडे मोजमाप काढून देण्यासाठी पत्र व्यवहार केले होते परंतु सहा महिने उलटून देखील सार्वजनिक बांधकाम विभागणे कोणतेही मोजमाप केले नाही आणि राहुरी तहसीलदार यांच्या पत्रा ला केराची टोपली दाखवली. नदीपात्रात अवैधरित्या रस्ता बनवणाऱ्या संबंधित व्यक्तीवर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे येत्या पाच जानेवारी रोजी राहुरी तहसीलदार यांच्या दालनासमोर भिम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन चे जिल्हाध्यक्ष दिपक रामजी साळवे हे उपोषनास बसणार आहेत. त्याच बरोबबर राहुरी नगरपरिषदेच्या मालकीची नावघाट येथील भिंत तोडून हा रस्ता बनवला होता त्या बाबतीत राहुरी नगरपरिषद नेमकी कोणत्या प्रकारे कारवाई करणार कडे राहुरी तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. या फिरोज शेख नामक व्यक्ती वर कठोर कारवाई जर झाली नाही तर भिम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन चे जिल्हाध्यक्ष दिपक साळवे हे राहुरी तहसीलदार कार्यालय आज दिनांक समोर पाच जानेवारी रोजी उपोषण सुरु करण्यात आले आहे.असे बेकायदेशीर कृत्य करून शासकीय मालमत्तेचे नुकसान करने. अनिधिकृत गौण खनिज वापरून नदीपात्रातून रस्ता बनवुन स्वतःच्या खाजगी बांधकामासाठी रस्त्या चा वापर करणे हा गंभीर गुन्हा असून फिरोज शेख या व्यक्ती वर कारवाई व्हावी अशी मागणी दिपक साळवे यांनी केली हे या उपोषणास भेट देण्यासाठी माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांनी भेट घेऊन संबंधित अधिकारी यांना कॉल करून आजच्या आज कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच बरोबर अक्षय कर्डीले यांनी भेट देऊन तहसीलदार अमित पवार यांना बोलवून लगेच कारवाई करायला सांगितले. उपोषणास

नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे सर 

नंदुभाऊ तनपुरे

गजानन सातभाई. नंदू तनपुरे.सागर तनपुरे.अरुण दळवी

अक्षय कर्डीले.दादा पाटील सोनवणे. सुनिल ठकाजी पवार.राजु उंडे 

गणेश खैरे

पिंटू नाना साळवे.वंचीत बहुजन आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख

बाळासाहेब जाधव. तालुका अध्यक्ष वंचित आघाडी.

निलेश दिनकर शिरसाट .राष्ट्रीय युवक शहर अध्यक्ष अजितदादा गट 

निलेश बाळासाहेब जगधने -सामाजिक कार्यकर्ते .

बाबासाहेब तुकाराम शिंदे .तालुका भारतीय जनता पार्टी राहुरी तालुका अध्यक्ष . भगवान सुखदेव गायकवाड .सामाजिक कार्यकर्ते संजय प्रकाश जाधव 

सत्यवान खाटेकर सामाजिक कार्यकर्ते 

योगेश चंद्रभान पवार रिपब्लिकन युवा सेना तालुका अध्यक्ष पत्रकार 

सुरज गोळे सामाजिक कार्यकर्ते दादुभाऊ साळवे सामाजिक कार्यकर्ते

किरण भाऊ साळवे सामाजिक कार्यकर्ते

सचिन महीपती साळवे व इतर सामाजिक कार्यकर्ते हजर होते