आसमान भरारी कादंबरीतून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी परमानंद यांची महत्वपूर्ण भूमिका प्रकाश झोतात.

आसमान भरारी कादंबरीतून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी परमानंद  यांची  महत्वपूर्ण भूमिका प्रकाश झोतात.

अहिल्यानगर प्रतिनिधी//

इतिहासापासून दुर्लक्षित असलेले ठिकाण वारणेच्या तीरावर सातारा येथे होत असलेल्या .अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे प्रकाश झोतात.

      खेडले परमानंद येथे प्रत्यक्ष भेट देऊन कवी परमानंद यांच्या विषयीची सर्व माहिती व अभ्यास पानिपतकार विश्वास पाटलांनी केला.स्वामी परमानंद रचित शिवभारत ग्रंथ,नेवासा येथील ज्येष्ठ पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे,समाजसेवक आबा मुळे ,खेडले परमानंद येथील मठाचे व्यवस्थापक भाऊसाहेब मोकाशी व खेडले परमानंद येथील पत्रकार संभाजी शिंदे यांच्या सहकार्याने ग्रामस्थांच्या व ठिकाणाच्या अभ्यासातून पाटलांनी परमानंद यांच्या विषयी माहिती घेतली.

        या ठिकाणी असलेल्या शिवकालीन परमानंद यांच्या तत्कालीन अन्नपुरवठा व्यवस्थेसाठी वापरण्यात आलेल्या मोठ्या जात्याचे,हत्तींच्या मेखी ,घोड्यांचा पागोटा,मुळा नदीचा विस्तृत चंद्रकांर परिसर ,खेडले परमानंद ते गोरक्षनाथ गड असा भुयारी मार्ग आजही परमानंद यांच्या गौरवशाली शिवकालीन इतिहासाची साक्ष देत आहे.

      भुरीमार्गात ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी अभ्यासु वृत्तीने ठिकठिकाणी विहिरीतून गुप्तपणे

 ऑक्सिजन येण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती.

        शिवभारत कार कमी परमानंद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याहून सुटकेच्या दरम्यान गोसावी बैरगी , साधू संन्यासी यांच्या ओळखीने गुप्त मार्गाने दक्षिणेत येण्यास जी मदत केलेली होती त्याची सखोल माहिती आसमान भरारी या कादंबरीतून विश्वास पाटील यांनी मांडलेली आहे.

      या कादंबरीच्या निमित्ताने कवी परमानंद यांच्या विषयी व कवी परमानंद यांचे शिव भारत ग्रंथाचे लेखन स्थळ असलेल्या खेडले परमानंद विषयी जी माहिती आजपर्यंत समाजापासून लपवण्यात आलेली होती ती विश्वास पाटलांमुळे समाजासमोर आली.

        त्याबद्दल विश्वास पाटलांचे खेडले परमानंद ग्रामस्थ व इतिहास प्रेमी नागरिक सदैव रुणीरातील अशी भावना पत्रकार संभाजी शिंदे यांनी व्यक्त केली.

         ऐतिहासिक दृष्ट्या खेडले परमानंद येथील शिव भारत कार कवी परमानंद यांचा मठ समाजासमोर आल्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल व नक्कीच गावाचा विकास होईल . कारण नेवासा तालुका हा साहित्याचे

विद्यापीठ आहे.

   या ठिकाणी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ माऊली ज्ञानेश्वरांनी लिहिला,याच तालुक्यात कवी परमानंद यांनी शिवभारत हा ग्रंथ लिहिला अशा या नेवासा तालुक्याचा साहित्यिक दृष्ट्या विकास होणे तितकेच आवश्यक आहे.