चार वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱा 55 वर्षीय इसम नागरिकांच्या हाणामारीत जखमी, उपचारादरम्यान मृत्यू.

चार वर्षीय बालकावर  अनैसर्गिक अत्याचार करणाऱा 55 वर्षीय इसम नागरिकांच्या हाणामारीत  जखमी, उपचारादरम्यान मृत्यू.

प्रतिनिधी ;-संभाजी शिंदेे   

           निर्लज्जपणाची हद्दपार करत एका 55 वर्षीय नराधमाने चार वर्षीय बालकास घरामध्ये घेऊन जात त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना नगर शहरात घडली असून, संबंधित प्रकरणाची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात मुलाच्या आईने दिलेली आहे.

       घटनेचा सविस्तर वृत्तांत असा आहे की, भेंडा येथील राजेश काशिनाथ सोनार वय 55 मुळगाव भेंडा, तालुका नेवासा हे व्यावसायिक कारणास्तव अहमदनगर येथील बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर या ठिकाणी वास्तव्यास होते.

     फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित मुलाने आईकडे पाच रुपयाची मागणी केली होती. आईने त्याला पाच रुपये दुकानात जाण्यासाठी दिले.

दरम्यान खूप वेळ झाला तरी मुलगा न आल्याने आईने शेजारीपाजारी चौकशी केली असता , मुलाला सोनार बाबा घेऊन गेल्याचे समजले.

             तेव्हा सोनार बाबा यांच्याकडे आई गेली असता अनैसर्गिक अत्याचाराचा प्रकार पाहून आरडाओरडा केला. व नागरिकांना जमा केले.

           सदर आरोपीने या चार वर्षीय अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा किळसवाणा प्रकार केला, याची चीड आल्यामुळे स्थानिक नागरिकांनी या आरोपीस चोप दिला होता. यामध्ये तो गंभीर जखमी झालेला होता. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान   

राजेश काशिनाथ सोनार याचा मृत्यू झाला आहे.

           त्यामुळे सदर आरोपीस मारहाण करणाऱ्या विरुद्ध कायदा हातात घेतल्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असे पोलिस सूत्रांकडून समजते.

         याबाबतचा पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात येत आहे.