*देसवंडी येथे क्रॉपसॅप अंतर्गत शेतीशाळेत शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मिळाले योग्य मार्गदर्शन .*

*देसवंडी येथे क्रॉपसॅप अंतर्गत शेतीशाळेत शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मिळाले योग्य मार्गदर्शन .*

*देसवंडी येथे क्रॉपसॅप अंतर्गत शेतीशाळेत शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मार्गदर्शन*

     *राहुरी* - कापूस पिकाच्या योग्य वाणांची निवड, जिवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया तसेच माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर करावा असे आवाहन राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे क्रॉपसॅप संलग्न कापूस पिक शेती शाळेच्या कार्यक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी श्री चंद्रकांत म्हसे यांनी केले.

             चंद्रकांत म्हसे पुढे म्हणाले की कापूस पिकात सापळा पिकांची लागवड करणे, लागवडीचे योग्य अंतर ठेवणे तसेच कृषी विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या मोहिमा जसे की प्रकाश सापळेद्वारे हुमणी अळी नियंत्रण ,10 टक्के रासायनिक खत बचत , बीजप्रक्रिया, ऊस पाचट व्यवस्थापन ,बीबीएफ यंत्राने पेरणी, पीक स्पर्धा, प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग, शेती शाळा इत्यादी मोहिमांमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून शेतीचा होणारा उत्पादन खर्च कमी करावा. तसेच कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महाडीबीटी वरील विविध योजनांची माहिती दिली.

           याप्रसंगी उपस्थित प्रगतशील शेतकरी श्री संतोष लक्ष्मण शिरसाठ, रमेश कोकाटे ,संदीप इंगोले ,नितीन शिरसाठ ,संदीप शिरसाठ, आदिनाथ कोकाटे ,अनिल शिरसाठ, सागर शिरसाठ ,राजेंद्र शिरसाठ, सुरज कोकाटे, वेणूनाथ कोकाटे, दीपक कोकाटे ,अनिल पवार ,संतोष शिरसाठ ,संदिप कोकाटे आदी शेतकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी श्री प्रशांत डहाळे व कृषी पर्यवेक्षक श्री तुळशीराम पवार हे उपस्थित होते .

सहाय्यक कृषी अधिकारी श्री शरद लांबे यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले.