*डॉ. प्रवीण खैरे यांची आदर्श कृषीसेवक शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी निवड*

*डॉ. प्रवीण खैरे यांची आदर्श कृषीसेवक शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी निवड*

कृषिसेवक मासिक, जळगाव तर्फे दरवर्षी प्रयोगशील व इतरांसाठी प्रेरक असलेल्या भूमिपुत्रांचा गौरव हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करून करण्यात येतो.

यंदाचा *पाचवा गौरव सोहळा ५ फेब्रुवारीला रावेर ता. रावेर जि जळगाव येथे* मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.

हा कार्यक्रम रावेर येथील स्टेशन रोडवरील *श्रीमती शेनाबाई गोंडू पंडित मराठा समाज मंगल कार्यालायात ५ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता* संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या *अध्यक्षस्थानी माजी आमदार अरुणदादा पाटील* असतील. तर पुरस्कार वितरण *माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात* यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. पुरस्कारार्थींच्या *कार्याचा आढावा व परिचय विशेषांकाचे प्रकाशन माजी कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर* यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे *उद्घाटन रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे* करतील.  

डॉ. प्रवीण बाबासाहेब खैरे हे एक गरीब कुटुंबातील उच्च शिक्षण घेणारे व्यक्तिमत्त्व. ते मूळचे राहणारे बदनापुरचे, बारावीपर्यंत शिक्षण घेऊन आपल्याला कृषि शिक्षण घ्यायचं व कृषिक्षेत्रात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करायची त्यांची प्रबळ इच्छा त्यांना पुढे घेऊन गेली. बी.एस्सी . च शिक्षण घेऊन त्यांनी एम. एस्सी. रोगनिदानशास्त्र या विभागातून केली. त्यांनी २०१७ साली कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथे त्यांच्या मुग पिकावरील करपा या रोगावर अभ्यास केला, त्यासाठी त्यांना २०२१ साली चौथी कृषी आतंरराष्ट्रीय संशोधन परिषद उत्तर प्रदेश या ठिकाणी उत्कृष्ट शोध निबंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१७-२०१८ या कालावधीत त्यांनी कृषी महाविद्यालय, नायगाव येथे काम करत असताना आळींबी उत्पादन तंत्रज्ञान, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान, हरितगृहाचे फायदे व केळी उती संवर्धनाचे फायदे शेतकऱ्यांना (Farmer's Visit) या माध्यमातून सांगितले. त्यांनी शेतकऱ्यांना रोग व किडींच्या व्यवस्थापनाची योग्य माहिती मराठी भाषेतून मिळावी म्हणून विवीध कृषी वृत्तपत्र, निबंधपत्र, मासिक यातून जवळ जवळ ७० पेक्षा जास्त लेख प्रकाशीत केलेले आहे. त्यात अग्रोवन या महाराष्ट्र पातळीवर वाचल्या जाणाऱ्या वृत्तपत्राचा सुद्धा समावेश आहे. शिवाय त्यांनी रेडिओ संभाषण देऊन सुद्धा शेतकऱ्यांना अनेक विषयावर मार्गद्शन केलेले आहे. सध्या डॉ. प्रवीण खैरे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथून त्यांच वनस्पती रोगशास्त्र या विषयामधून आचार्य पदवी शिक्षण पूर्ण करून याच विषयासाठी म. फू. कृ. वि. राहुरी येथे संशोधन सहयोगी या पदावर कार्यरत आहे. यादरम्यान निष्ठेने व श्रध्देने कृषिक्षेत्राच्या विकासासाठी व शेतकरी बांधवाच्या उन्नतीचा मार्ग दाखिण्यासाठी केलेले कार्य उल्लेखनीय व प्रेरणदायी आहे. म्हणून विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय १२ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यात युवा संशोधक, उत्कृष्ट संशोधक, आदर्श कृषितज्ज्ञ, युवा रोगतज्ञ, कृषी व सामाजिक या प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे.