पोलीस अधिकाऱ्यांसह दोन पोलीस शिपायांना मारहाण. .! ! मारहाण करणाऱ्या अपहृत मुलीच्या तीन नातेवाईकांना अटक. .! ! पोलिसांना मारहाणी नंतर अपहरणकर्ता पोलिसांत हजर. .! !
श्रीरामपूर ::-- श्रीरामपूर तालुक्या शेजारी असणारे अशोकनगर या गावातील फेब्रुवारी महिन्या मध्ये या ठिकाणची मुलगी बेपत्ता झाली होती. याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीचा शोध लागावा या मागणीसाठी तिच्या कुटुंबियांनी नुकतीच वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार केली होती व उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता.दिनांक 14 मे 2022 या दिवशी मुलीचे कुटुंबीय उपोषणास बसणार होते. या प्रकरणात तपासी अधिकारी असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री. समाधान सुरवाडे यांच्या तपास कार्यपद्धतीवर सदर कुटुंबीय नाराज होते. कारण वेळोवेळी हे कुटुंबीय मुलीच्या शोधा करिता पोलीस स्टेशन या ठिकाणी चकरा मारूनही त्यांच्याकडून तपासामध्ये दिरंगाई करून त्याना व्यवस्थित उत्तरे मिळत नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याकडे उपोषणाचा इशारा देऊन तक्रार नोंदवली होती. दरम्यान गुरुवार दिनांक 12 मे 2022 रोजी शिर्डी याठिकाणी साईबाबा मंदिर असलेल्या गेट क्रमांक 4 च्या समोर अपहरणकर्त्यांने त्या मुलीस आणून सोडून दिले. ही माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी शिर्डी कडे धाव घेतली असता त्या ठिकाणी ती मुलगी तिचे वडील व नातेवाईकांना मिळवून आली. या घटनेची माहिती शिर्डी पोलिसांना देण्यात आली. सदर मुलीला शिर्डी येथील पोलीस घेऊन श्रीरामपूर येथील शहर पोलीस ठाण्यात आले. पोलीस ठाण्यात आल्यानंतर सदरील मुलीची वैद्यकीय तपासणी करण्याचे तिच्या कुटुंबियांनी पोलीस उपनिरीक्षक श्री सुरवाडे यांना सांगितले. आणि नंतर कुटुंबीयांनी सदरील आरोपीला ताब्यात का घेतले नाही अशी विचारणा श्री. सुरवाडे यांना केली. या कारणावरून तिच्या कुटुंबाची व श्री उपनिरीक्षक सुरवाडे यांच्याशी शाब्दिक चकमक झाली. शाब्दिक चकमकीचे रूपांतर काही वेळेत मारहाणीत झाले. या ठिकाणी हजर असलेल्या प्रतिष्ठित नागरिकांनी हस्तक्षेप करत वाद सोडविण्याचा प्रयत्न केला.सदरील नातेवाईकांना आवरण्यासाठी काही पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी आले असता त्यांना देखील नातेवाईकांनी धक्काबुक्की करण्यात केली.या नंतर पोलिसांनी धक्काबुक्की करणाऱ्या तीनही आरोपींना गुरुवारी अटक करून शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.पोलिसांनी आरोपींना सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने मात्र त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. याचं काळात मारहाणीचे हे प्रकरण घडले असता मुलीचे अपहरण करणारा आरोपी शुक्रवारी सायंकाळी स्वतः शहर पोलिस ठाण्यात हजर झाला असता पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल.सदरील मारहाणीचे प्रकरण घडल्यानंतरच आरोपी हजर कसा झाला ? या अगोदर तो पोलिसांना का मिळून आला नाही ? पोलिसांनी त्यास शिर्डी या ठिकाणी का अटक केली नाही ? असे अनेक प्रश्न मुलीच्या नातेवाईकांनी उपस्थित केले. जर आरोपीला अगोदरच अटक केली असती तर हे सर्व मारहाणीचे प्रकरण घडले नसते असे मुलीच्या नातेवाईकांसह इतरांचे म्हणणे झाले. दरम्यान अपहरणकर्त्यांच्या जबाबा नंतरच अपहरणाचे सर्व प्रकरण काय आहे हे उजेडात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.. !!