*"श्री भगवंत प्रगट दिना" निमित्त बार्शी येथे विविध कार्यक्रमा सह "महाप्रसाद सोहळा"*

*"श्री भगवंत प्रगट  दिना"  निमित्त  बार्शी  येथे  विविध  कार्यक्रमा  सह  "महाप्रसाद  सोहळा"*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज सोलापूर

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

बार्शी.(ता.बार्शी)           आज दि.13-05-2022 रोजी भगवंत नगरी म्हणजेच बार्शी शहरात भगवंत प्रगट दिन जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली गेल्या दोन वर्षापासून बार्शीतील जगदाळे अशा मोठ्या कार्यक्रमापासून वंचित राहिली होती कसल्याही प्रकारची जयंती अथवा भक्तीचे कार्यक्रम करण्यात आले नव्हते कोरोना काळात शासनाच्या आदेशानुसार बार्शीतील जनतेने नियमाचे पालन केले.

मात्र यावर्षी भगवंत महोत्सव अतिशय हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. बार्शीतील जनतेने या कार्यक्रमाला पूर्णपणे प्रतिसाद दिला. भगवंत महोत्सव पूर्ण सप्ताभर विविध प्रकारच्या कार्यक्रमाने साजरे करण्यात आले. यामध्ये हास्यनाट्य कला, कीर्तने, नाट्यकला, लोकसंगीते, आतिषबाजी अशाप्रकारे असे अनेक मोठमोठे कार्यक्रम घेण्यात आले.

आज भगवंत प्रगट दिनानिमित्त मॉर्निंग सोशल फाउंडेशन बार्शी च्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सरासरी एका वेळेस 500 ते 600 जेवणाला बसण्याची व्यवस्था करून अशा अनेक पंगती या महाप्रसाद सोहळ्यादरम्यान झाल्या. या जयंती निमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवण्यात आले जसे शिवकालीन मर्दानी खेळ लाठी-काठी प्रशिक्षण आखाडा बार्शी श्री दादासाहेब अंकुश लोहार त्यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून त्यांच्या सहकारी सोबत वेगवेगळी कला सादर करून दाखवली. यामध्ये तरुण युवक-युवती स्वतः कसे निर्भर राहू शकतो याचे जागते उदाहरण त्यांनी दाखवून दिले. त्यांनी या लाटीकाटी च्या माध्यमातून बाल युवकांना, तरुण युवकांना स्वतः कसे रक्षण करता येईल याचे प्रशिक्षण दर आठवड्याला देण्यात येत असते. असे विविध कार्यक्रम या कार्यक्रमादरम्यान ठेवण्यात आले. तसेच या कार्यक्रमात पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी च्या संघटनेने एक हात मदतीचा म्हणून कार्य केले.