अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याकडे राहुरी विद्यापीठाचा अतिरिक्त पदभार .

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याकडे राहुरी विद्यापीठाचा अतिरिक्त पदभार .

*अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्याकडे राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त पदभार .

 

          राज्याचे राज्यपाल यांच्या मान्यतेने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्याकडे राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा कुलगुरु पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. विद्यापीठ कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या निधनानंतर विद्यापीठ अधिष्ठाता डॉ . साताप्पा खरबडे यांनी प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार सांभाळला आहे . 

 

           डॉ.शरद गडाख यांची अकोला कृषि विद्यापीठाचे कुलगुरु होण्यापूर्वी ते महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये संशोधन व विस्तार शिक्षण संचालकपदी कार्यरत होते. डॉ. शरद गडाख हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे ते 19 सप्टेंबर, 2022 पासून कुलगुरु या पदावर कार्यरत आहेत. कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये त्यांच्या कार्यकाळात विविध पदावंर काम केलेले आहे. त्याच्या कार्यकाळात विद्यापीठाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरु झाली. त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम महात्मा फुले कृषि विद्यापीठात राबविले. यामध्ये विद्यापीठाची पडीक जमीन लागवडीखाली आणने, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठाचे विक्री केंद्र सुरु करणे, फळबागेखाली लागवड क्षेत्र वाढविणे, विविध फळांचे प्रात्यक्षिक प्रकल्प, सेंद्रिय शेती प्रकल्प नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविले. यामुळे विद्यापीठाच्या महसुली उत्पादनात वाढ होवून शेतकर्यांना त्यांच्या जिल्ह्यातच विद्यापीठाचे उत्पादने उपलब्ध झाली. तसेच शेतकरी प्रथम आणि मॉडेल व्हिलेज संकल्पनेमुळे कृषि विस्तारामध्ये नविन मापदंडे स्थापीत झाली. 

            अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. यामध्ये त्यांनी हजारो हेक्टर पडिक जमीन लागवडीखाली आणली. प्रक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात शेततळे करुन कायम स्वरुपी सिंचनाची व्यवस्था केली. यामुळे जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली आल्यामुळे फळबागेखाली क्षेत्र वाढले. विविध वाणांच्या बिजोत्पादनाचे क्षेत्र वाढविले. संशोधन केंद्रांचे बळकटीकरण केले. मॉडेल व्हिलेज, शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन करुन कृषि विस्ताराला नविन दिशा दिली. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक परिक्षा मंच, उद्योजकता विकास मंच, हायटेक अॅग्री मंच यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले.

 

           राहुरी येथील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात दैदिप्यमान कार्य केलेले आहे. त्यांनी विविध पिकांचे 19 वाण विकसित केलेले आहेत. यामध्ये वांग्याचा एक, कारल्याचे पाच, काकडीचे दोन, वालचे एक, ज्वारीचे नऊ आणि नागलीचा एक वाण विकसित केलेले आहे. त्यांचे आत्तापर्यंत 68 संशोधन लेख, 36 तांत्रिक लेख, 128 विस्तार लेख आणि विविध प्रकाशने प्रसिध्द झालेली आहेत. त्यांच्या शिक्षण, संशोधन आणि कृषि विस्तारातील अभुतपूर्व योगदानामुळे त्यांना जागतिक स्थरावरील एक पुरस्कार, राष्ट्रीय पातळीवरील तीन पुरस्कार आणि राज्य पातळीवरील सहा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. डॉ. शरद गडाख यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे राज्यपाल महोदयांनी त्यांना राहुरी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. या निवडीमुळे राज्याच्या सर्व स्तरातून डॉ. शरद गडाख यांचे अभिनंदन होत आहे.