अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीस १ वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा .

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीस १ वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा .

 अहमदनगर : आरोपी नामे सलमान उर्फ माईकल एजाज शेख , वय २७ वर्षे , रा . बेलदार गल्ली , मुकुंदनगर , अहमदनगर जि . अहमदनगर याने पिडीत फिर्यादी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा हात धरून ओढत डब - याकडे चल म्हणून विनयभंग केल्याप्रकरणी अहमदनगर येथील मा . माधुरी एच . मोरे मॅडम , अतिरिक्त व विशेष ( पोक्सो कोर्ट ) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दोषी धरून भा.दं.वि. कलम ३५४ , ३५४ ( ब ) तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम १२ नुसार दोषी धरून आरोपीस १ वर्षे सक्त मजुरी व रूपये ३,००० / - रूपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . घटनेची थोडक्यात हकीगत की , पिडीत मुलगी व आरोपी हे एकाच परिसरात राहणारे आहेत . वय वर्षे १४ असलेली अल्पवयीन पिडीत मुलगी ही तिची मैत्रिणीसोबत अरबी भाषेच्या क्लासला जात असताना , आरोपी हा फिर्याद देण्याच्या एक महिना अगोदर पासून तिचा पाठलाग करत होता . दिनांक १३.०३.२०१ ९ रोजी पिडीत मुलगी हि तिच्या मैत्रीणीसोबत संध्याकाळच्या सुमारास अरबी भाषेच्या क्लास वरून पुन्हा घरी जात असताना , आरोपीने तिचा हात पकडला व पिडीत मुलीच्या सोबत असलेल्या मैत्रिणीला तेथून हाकलून दिले . त्यानंतर आरोपी पिडीत मुलीला म्हणाला की , “ माझ्या सोबत 

डब - यामध्ये चल " पिडीत मुलीने नकार दिला असता , आरोपी तिचा हात धरून तिला जोराने ओढत घेवून जावू लागला . पिडीत मुलगी ही आरोपीच्या हातातून तिचा हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करीत होती . परंतु आरोपी तिचा हात सोडत नव्हता . त्यावेळी पिडीत मुलीने आरडा - ओरडा केल्याने परिसरातील लोक तेथे जमा झाले नंतर आरोपी तेथून पळून गेला . सदरची घटना पिडीत मुलीने घरी आल्यानंतर तिच्या घरच्यांना सांगितली . त्यानंतर पिडीत मुलीने तिच्या वडिलांसोबत तोफखाना पोलिस स्टेशनला जावून आरोपी विरुध्द रितसर फिर्याद दिली . घटनेचा संपूर्ण तपास पोलिस उप निरीक्षक वैभव पेठकर यांनी करून मा . न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले . या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले . यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी , पंच साक्षीदार , प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासी अधिकारी , वयासंदर्भात मुख्याध्यापक व नगर परिषद यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या . सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला की , पिडीत मुलीसोबत असलेली तिची मैत्रिण ही देखील आरोपीच्या दहशतीमुळे मे . कोर्टासमोर साक्ष देणेकामी हजर राहिलेली नाही . तसेच इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देखील आरोपीच्या दहशतीमुळे कोर्टासमोर येत नव्हते . यावरून आरोपी याची राहत असलेल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दहशत असल्याचे दिसून आले तसेच ही बाब पोलिस रिपोर्टवरून स्पष्टपणे निदर्शनास आले . त्यामुळे आरोपीस जर योग्य ते शासन झाले नाही तर आरोपीचे मनोधैर्य वाढेल व अशा प्रकारच्या घटना आरोपीकडून पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही . तरी आरोपी विरुद्ध वय वर्षे १४ असलेली अज्ञान मुलगी खोटे का सांगेल याबाबत आरोपीच्या वकीलांनी कुठेही खुलासा केलेला नाही . तरी आरोपीस योग्य ती शिक्षा करावी . तसेच आलेला पुरावा ग्राहय धरून आरोपीस मा . न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . त्यांना पैरवी अधिकारी आडसुळ , तसेच पो . कॉ . शेख यांनी सहकार्य केले . 

अहमदनगर 

ता . २०/०१/२०२३

 ( अॅड . मनिषा पी . केळगंद्रे- शिंदे )    

    विशेष सरकारी वकील ,

 अहमदनगर . 

मो . ९ ८५०८६०४११,

८२०८ ९९ ६७ ९ ५