अहिल्याबाई होळकर शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप संभारंभ व स्व. मोहनलाल चोपडा यांनी दिलेल्या संरक्षण भिंतीचे उद्घाटन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न.
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे स्व.मोहनलाल गिरीधरलाल चोपडा यांनी दिलेल्या संरक्षण भिंतीचे उद्घाटन व दहावीच्या मुलांना निरोप समारंभ सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडला.
हा सोहळा मा.उपसभापती कारभारी चेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनिअर गीताराम मुंगसे लाभले. हा निरोप समारंभ सोहळा सरस्वती मातेचे पूजन व दीप प्रज्वलनाने सुरुवात करण्यात आला. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड सर यांनी केले.
आलेल्या प्रमुख मान्यवरांचे शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आले .तर शाळेच्या टॉयलेट व रंगकामासाठी दिलेल्या शिक्षकांचे व मान्यवरांचेही सन्मान. करण्यात आले.
यावेळी गावातील दानशूर व्यक्तीने दिलेल्या बक्षिसांचा गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देताना दहावीच्या काही विद्यार्थिनींनी आपली मनोगत व्यक्त केली .या वेळी दहावीच्या विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते.
यावेळी प्रमुख मान्यवर इंजिनिअर गीताराम मुंगसे यांनी आपल्या जीवनाचा खडतर प्रवास आपल्या मनोगतातून व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की, घरची परिस्थिती हालाखीची शाळेत जाण्यासाठी सायकलही नाही .दुसऱ्याबरोबर शाळेत जावा लागत होतं .ऐनवेळी वडिलांनी जमीन गहाण ठेवून व आईचे मंगळसूत्र मोडून कठीण परिस्थितीमध्ये मला शिकवले. व दोन वर्ष मी एका वेळच्या जेवणावर राहून घरची परिस्थिती लक्षात घेता मी जिद्दीन शिकलो. व आज तुमच्यापुढे वार्षिक 36 लाख रुपये वेतन घेतो आहे . परिस्थिती माणसाला घडवतही नाही व परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही माणूसच परिस्थिती घडवतो हे मूर्तीवंत उदाहरण मी आहे .अशीच सर्व मुलांनी आपली परिस्थिती ओळखून माझ्यापेक्षाही मोठ होण्याचं स्वप्न पूर्ण करावं .अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत असताना त्यांना रडू आवडले नाही. यानंतर दहावीच्या मुलांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यानंतर राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत ससाणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
हा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपल्यावर सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय मोहनलाल चोपडा यांनी दिल्या संरक्षण भिंतीचे उद्घाटन पार पडले. यावेळी श्री दिलीप कराळे सर यांनी मोहनलाल चोपडा यांची अहिल्याबाई होळकर शाळा निश्चित ऋणी राहील यांनी वेळोवेळी सहकार्य करून गावाच्या शालेय विकासात भर घातली आहे .अशी माणसं गौरवशाली असतात .या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमासाठी सोसायटीचे माजी चेअरमन कारभारी मुंगसे गावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे ,माजी सरपंच , दत्ता पाटील मुंगसे ,ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पोलीस गोपने दादा,
पाणीवाटप संस्थेचे चेअरमन संतोष तांबे , सुरेश कुटे, भाऊ हिवाळे,बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुभाष मुंगसे, सुनिल कुटे, व्यवसाय संघटनेने अध्यक्ष किशोर मुंगसे, खंडेश्वर कोकरे, विशाल होंडे, जोसेफ हिवाळे, शिवनेरी ग्रुपचे हिरामण फुलारी ,नितीन ससाने व सदस्य शाळेचे उपप्राचार्य चामुटे सर व सर्व शिक्षक वृंद व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एन गायकवाड सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार ज्ञानदेव कदम सर यांनी मानले.