सोनई मध्ये दिवाळी फराळ निमित्त कार्यकर्त्यांनी फुलला गडाखाचा मळा.
प्रतिनिधी बालाजी देडगाव युनूस पठाण
नेवासा तालुक्यातील सोनई येथे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमास पंधर हजार (15000) हून अधिक कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. कार्यकर्त्याच्या या मेळाव्याने गडाख मळा फुलून गेला.
या फराळाच्या कार्यक्रमास अनेक मोठे मोठे नेते मंडळी , महंत ,हरिभक्त पारायण महाराज मंडळी, सर्वसामान्य जनसामान्यातील कार्यकर्ते, हितचिंतक व गडाख कुटुंबावर सदभावणेने प्रेम करणारी मंडळी अनेक प्रकार च्या लोकांनी हा मळा दुमदुमला होता.
ज्येष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतरावजी गडाख साहेब, माजी मृदा जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख साहेब ,माजी सभापती सौ .सुनीताबाई शंकरराव गडाख ,आदरणीय विश्वास मामा गडाख, जिल्हा परिषद सदस्य सूनीलभाऊ गडाख, युवा नेतृत्व उदयन दादा गडाख, यांनी येणाऱ्या सर्व उपस्थितांचे स्वागत व अभिनंदन करत अनेक विषयावर चर्चा व दिवाळीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी आदरणीय यशवंतरावजी गडाख साहेब यांच्या तब्येतीची काळजी विषयी चर्चा व विचारपूस केली.
आदरणीय माजी जलसंधारण मंत्री नामदार शंकराव गडाख साहेब यांनी कार्यकर्त्या बरोबर दिवाळीच्या फराळाचा विशेष आनंद घेत सर्वांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
यावेळी देडगाव परिसरातून मुळा एज्युकेशन संस्थेचे सदस्य ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील मुंगसे ,नेवासा तालुक्याचे माजी उपसभापती कारभारी पाटील चेडे , ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मणराव बनसोडे, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे विद्यमान संचालक जनार्धन कदम, प्रगतशील शेतकरी बन्सी पाटील मुंगसे,ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके ,माजी सरपंच रामेश्वर गोयकर , उपसरपंच लक्ष्मणराव गोयकर ,माजी देवस्थान अध्यक्ष कुंडलिक दादा कदम, मा.सरपंच दत्ता पाटील मुंगसे, युवा नेते श्रीकांत हिवाळे, बाळासाहेब बनसोडे,महेश चेडे, बालाजी देवस्थान विश्वस्त हिरामण फुलारी, बालाजी कुषी उद्योग समूहाचे संचालक योगेश चेडे ,सचिन मुंगसे, योगेश खैरे, युवा नेते आशिष हिवाळे, आबा बनसोडे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नवनाथ फुलारी सर, नितीन गायकवाड, बथूवेल हिवाळे, प्रविण मुंगसे, गणेश मुंगसे, सचिन गोयकर, पप्पू भिसे, सागर बताडे, सागर मुंगसे,पोपट वां ढेकर , अप्पा दळवी,सचिन हिवाळे, बाबुराव हिवाळे ,व आदी कार्यकर्ते हितचिंतक उपस्थित होते.