महिला दिनाचे औचित्य साधून नेवासा फाटा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिला मेळावा संपन्न.

महिला दिनाचे औचित्य साधून नेवासा फाटा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिला मेळावा संपन्न.

भाजपच्या महिला मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद नेवासा प्रतिनिधी:: नेवासा भारतीय जनता पार्टी महिला आघाडी व नेवासा महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाच्या औचित्य साधून नेवासा फाटा येथे जी के मंगल कार्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामध्ये तालुक्यातील विविध क्षेत्रातील असंख्य महिला यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत नोंदवला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून दीप प्रज्वलन जय हरी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व माजी जिल्हा परिषद सदस्य सौ आशाताई मुरकुटे व भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष डॉ. निर्मला सांगळे डॉ. विद्या कोलते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवातआली. विविध क्षेत्रात अग्रगण्य कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान जय हरी महिला प्रतिष्ठानच्या वतीने सौ आशाताई मुरकुटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन कला ,क्रीडा ,शैक्षणिक सांस्कृतिक, शेती ,कुस्ती ,कबड्डी या क्षेत्रात आपले नाव लौकिक करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. कुस्ती सारख्या मर्दानी खेळातही नेवासा तालुक्यातील महिला मागे नाहीत नॅशनल लेव्हला सानिका पवार गोल्ड मिडल, धनश्री नवथर स्टेटलेव्हला सिल्वर मिडल मिळवलं त्यांचा सन्मान या वेळी करण्यात आला या वेळी त्यांना कुस्ती सारख्या क्षेत्रात मार्गदर्शक म्हणून आंतर राष्ट्रीय पंच निकाळजे सर यांचा ही सन्मान युवा मोर्च्या तालुका अध्यक्ष प्रताप चिंधे यांनी केला त्यानंतर महिलांनी आपापले कलागुणानुसार ,कथक पारंपरिक नृत्य ,लावणी व विविध गाण्यावरील नृत्य सादर केले त्यानंतर खेळ पैठणीचा या विविध स्पर्धा होऊन विजेत्यास सर्व महिलेस पैठणी भेट देण्यात आली व कार्यक्रमात नेवासा तालुक्यातील कवठा येथील सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार ह भ प.सौ योगेश्वरीताई दरंदले.यांनी भेट देऊन महिलांसाठी प्रबोधनपर विचार मांडले स्पर्धकांना आपले बक्षीस वितरण संध्याकाळी चार वाजल्यापासून रात्री ठीक नऊ वाजेपर्यंत महिलांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला ज्यां महिलांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांनाही सर्वांना कडून बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष श्री प्रताप चिधे भाजपचे तज्ञ मार्गदर्शक श्री डॉ. बाळासाहेब कोलते सलमान शेख किशोर जाधव आर्यन कोलते वसंत काळे भाजपचे सोशल मीडियाचे रडततालुका संयोजक आदिनाथ पटारे कृषी मित्र भागवत खराडे हरीश गाडेकर आकाश पवार प्रवीण क्षीरसागर विवेक अंबाडे शरद गरड आदी मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली.