*महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र हरेगाव येथे पायी जाणाऱ्या भावीकांचे डिग्रस येथील संतअँथोनी चर्च च्या वतीने केले हार्दिक स्वागत*

महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र हरेगाव येथील नवसाला पावणारी आरोग्यदायी माता पवित्र मारियेचा यात्रा उत्सव दि.14/09/2025 वार शनिवार व रविवार या दोन दिवस यात्रा होणार आहे या यात्रा उत्सवासाठी संपूर्ण भारतातून पदयात्रेने लोक येत असतात त्याचप्रमाणे अहिल्यानगर येथील डॉन बॉस्को चर्च सावेडी, संत अण्णा चर्च, अहिल्यानगर संत जॉन चर्च भिंगार अहिल्यानगर येथून दरवर्षीप्रमाणे तीन रथ घेऊन व

मा.फा.रा.रेव्ह.विश्वास परेरा प्रमुख धर्मगुरू संत जॉन चर्च भिंगार यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 550 ते 600 भाविक भक्त घेऊन फादर हरेगाव येथील यात्रेसाठी पायी चालत निघाले होते नेहमीप्रमाणे संत अँथोनी चर्च व मसीहा भजनी मंडळ डिग्रस यांच्या संयुक्त विद्यमानाने अहिल्यानगर येथून येणाऱ्या सुमारे 550 ते 600 भाविक भक्तांना नेहमीप्रमाणे संत अँथोनी चर्च डिग्रस गावाच्या वतीने व मसीहा भजनी मंडळ यांच्या वतीने हात पाय धुण्यासाठी पाण्याचा टँकर, खिचडी, बिस्किटे, चहा, पाणी बॉटल, केळी, संत्री, नायलॉन चिवडा, वेफर्स, फ्रुटी बॉटल ई. आलेल्या सर्व पदयात्रेकरू भाविक भक्तांना वाटप करण्यात आले आहे

यावेळी मा.फा.विश्वास परेरा यांचा सत्कार डिग्रस गावचे सरपंच.मा. रावसाहेब पाटील पवार यांनी केले तसेच डिग्रस येथील प्रभू ख्रिस्ताचे अभिषिक्त दास ब्रदर प्रिंन्स यांनी फादरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले यावेळी मसीहा भजनी मंडळाचे अध्यक्ष पत्रकार राजेंद्र पवार हे उपस्थित होते, तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार, सौ.विमल पोळ मॅडम,उमेश पवार, पोपट पवार, पत्रकार सचिन पवार, सुहास पवार, संदीप ओहळ, सनी पवार, पत्रकार दिपक मकासरे,पत्रकार सुहास पारखे, शांताराम पवार, राहुल पवार,रोहिणी गोरे मॅडम, मारिया बाई पवार,पवन पवार, आदेश भालेराव,भानुदास गव्हाणे सर,किशोर बोर्डे इ. तसेच संत अँथोनी चर्चेचे सर्व सभासद व मसीहा भजनी मंडळाचे सर्व सभासद यावेळेस उपस्थित होते








