बजरंग दल नेवासे शहर संयोजक पदी विकास लष्करें यांची निवड.. नेवासे शहर

बजरंग दल नेवासे शहर संयोजक पदी विकास लष्करें यांची निवड..
नेवासे शहर
नेवासे येथील सामाजिक कार्यकर्ते विकास लष्करे यांची
बजरंग दलाच्या नेवासे शहर संयोजक पदी निवड करण्यात आली आहे.
दि.१५ रोजी रविवारी बाभळेश्वर येथील नारायणगिरी महाराज आश्रम येथे आहिल्यानगर जिल्ह्याची आगामी काळात विश्व हिंन्दु परिषद बजरंगदल संघटना मजबुत करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी विश्व हिंन्दु परिषदेचे प्रान्त सहमंत्री सतीश गोर्डे यांनी विकास लष्करें यांच्या निवडीची घोषणा केली
यावेळी लष्करे म्हणाले की माझ्यावर आज मोठी जबादारी देण्यात आली मी या पदाच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल व संघटना मजुबत करण्यासाठी प्रयत्नशील राहील.
लष्करें यांच्या निवडी बद्दल विश्व हिंन्दु परिषदेचे विभाग मंत्री सुनिल खिस्ति जिल्हामंत्री विशाल वाकचौरे जिल्हासंयोजक शुभम मुर्तडक जिल्हानिधी प्रमुख प्रशांत बहिरट व राम राज्य उत्सव समिती नेवासे तालुका यांनी अभिनंदन केले आहे.