*अनुसुचित जाती (SC) आरक्षणामध्ये सरकारच्या उपवर्गीकरण करण्याबाबतच्या निर्णयास विरोध दर्शवून ता. राहुरीतील भिमसैनिकांचे तहसिलदारांना निवेदन.*

*अनुसुचित जाती (SC) आरक्षणामध्ये सरकारच्या उपवर्गीकरण करण्याबाबतच्या निर्णयास विरोध दर्शवून ता. राहुरीतील भिमसैनिकांचे तहसिलदारांना निवेदन.*

ता.राहुरी येथील सर्व भिमसैनिकांनी सरकारने अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याबाबतच्या निर्णयास विरोध दर्शवून शासनापर्यंत प्रमुख मागण्या पोहोचवण्यासाठी तहसिलदारांना निवेदन दिले. यामध्ये १)राज्य सरकारने अनुसूचित जाती प्रवर्गत कोणतेही उपवर्गीकरण करू नये.२) केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध पुनर्वीचार याचीका दाखल करावी किंवा संसदेत कायद्याने संरक्षण द्यावे.३) हा निर्णय रद्द होईपर्यंत राज्यात कोणतीही अंम्मल बजावणी करू नये. ४ ) सर्व अनुसुचित जातीची जातीनिहाय जनगणना करूनच पूढील धोरण ठेवावे. ५ )पदोन्नती मधील आरक्षण तात्काळ लागू करावे.यावेळी या सर्व मागण्या सरकारने मान्य कराव्या असे निवेदनाद्वारे सर्व भिमसैनिकि,विविध संघटणांच्या नेत्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले आहे,

तसेच आमच्या विरोधाची प्रमुख कारणे,

१) *घटणाबाह्य तरतूद* :डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या कलम ३४१ नुसार अनुसूचित जाती हा एकसंघ प्रवर्ग ठेवला आहे.वर्गीकरण करणे हे राज्यघटनेच्या मूळ उद्देशाला छेद देणारे आहे,

२) *सामाजिक विभाजन*:उपवर्गीकरणामुळे जाती-जातीमध्ये संघर्ष वाढेल व फोडा आणि राज्य करा ही नीती पुन्हा राबवली जाईल,त्यामुळे अनुसूचित जातीची सामूहिक ताकद कमकुवत होईल,

३) *आकडेवारीचा अभाव*:कोणत्या जातीला किती लाभ मिळाला याची वस्तुनिष्ठ,जातीनिहाय जनगणना झालेली नाही,आकडेवारी शिवाय उपवर्गीकरण करणे हे अन्यायकारकच आहे,

४) *आरक्षणाचे मुळ तत्व*:आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी आहे,आर्थिक निकषावर नाही,मागासलेपणाचे निकष केवळ शैक्षणिक व सामाजिक असावेत,

५) *प्रशासकीय गुंतागुंत*:उपवर्गीकरणामुळे नोकर भरती प्रवेश प्रक्रिया यामध्ये गोंधळ वाढेल,व न्यायालयीन खटले वाढून तरुणांचे नुकसान होईल,

तरी माननिय तहसीलदार साहेब आपण शासनाचे प्रतिनिधी असलेने आमच्या भावना ह्या शासनापर्यंत पोहोचवण्यास आम्हास सहकार्य करावे व तातडीने योग्य ती कारवाई करावी,

त्याचप्रमाणे वरील निवेदनाची तात्काळ दखल शासन स्तरावर घेण्यात यावी याकरिता शासनाचे मुख्य प्रतिनिधी तसेच अहिल्या नगर जिल्ह्याचे माननिय पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांना सदरील निवेदन आम्ही सर्व आंबेडकरी समाज पायी लाँग मार्च द्वारे त्यांच्या निवासस्थानी दि.०१ /जून/२०२६ रोजी देणार आहोत असे भिमसैनिकी नेत्यांनी राहुरी तहसिल कार्यालय येथे निवेदन देऊन पत्रकारांशी बोलतांना सांगीतले.