*वीज क्षेत्रातील सर्वात मोठा संप* *महावितरण, महापारेषण, महा जनरेशन संप विशेष*

*वीज क्षेत्रातील सर्वात मोठा संप* *महावितरण, महापारेषण, महा जनरेशन संप विशेष*

सध्या महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील महावितरण महापारेषण व महाजनरेशन या तीनही कंपनीतील सर्व अधिकारी व कर्मचारी हे संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर आज दिनांक 04 जानेवारीपासून ते 06 जानेवारीपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन संप करत आहेत. हा संप कामगारांच्या कोणत्याही आर्थिक मागणीसाठी नसून, ग्राहकांच्या पैशातून आशिया खंडात सर्वात मोठी वीज क्षेत्रातील अग्रगण्य असणारी कंपनी ही खाजगी भांडवलदारांच्या घशात घालू नये यासाठी आहे.

 थोडक्यात सांगायचे झाले तर केंद्र शासन व राज्य शासन यांनी मिळून सर्व शासकीय कंपन्या अदानी, अंबानी, टाटा, टोरेंटो यासारख्या खाजगी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे. व आजही ग्राहकांच्या मालकीची असणारी वीज क्षेत्रातील या तीनही मोठ्या कंपन्या खाजगी भांडवलदारांना देण्याचा घाट केंद्र शासन व राज्य शासनाने घातला आहे. ज्या अदानिने रेल्वेचा सरकारचा काही भाग विकत घेतला. ज्या अदानी याने विमानतळावरील पार्किंगचा भाग स्वतःकडे घेऊन 20 रुपये पार्किंग असणारी पावती 160 रुपयाला केली. ज्याप्रकारे सरकारने BSNL बंद पाडले व सरकारच्याच आशिर्वादाने अंबानीने जिओ नेटवर्कची सवय ग्राहकांना लावून सुरुवातीला 399 रुपयात दोन जीबीचे पॅकेज देणारे, आज 749 रुपयात तेच पॅकेज देत आहेत. यावरून हे केंद्र व राज्य सरकार खाजगी भांडवलदारांना हाताशी धरून सुरुवातीला कमी भावामध्ये ग्राहकांना खोटी सवय लावून नंतर खाजगी भांडवलदारांच्या मनानुसार ग्राहकांची लूट करण्यास खाजगी भांडवलदारास मदत करत आहेत त्यामुळे सर्व ग्राहकांनी हे लक्षात घ्यावे की सध्या 24 क्षेत्रातील संप होत आहे हा कामगारांच्या कोणत्याही आर्थिक मागणीसाठी नसून फक्त ग्राहकांच्या मालकीचे असणारी वीज कंपनी विद्यमान सरकार ज्या खाजगी भांडवलदारांना विकत आहे त्याच्या विरोधात आहे कारण तुमच्या आजपर्यंतच्या पैशातून महाराष्ट्रभर लाईटचे पोल असतील, ट्रान्सफॉर्मर असतील, सबस्टेशन असतील हे सर्व तयार करण्यात आले आहे व हे विकण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला निश्चित नाही. त्यामुळे आपण सर्वांनी संपामध्ये उतरलेल्या सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गांना आपला पाठिंबा द्यावा व अब्जावधी रुपयाची आपली ग्राहकांचे प्रॉपर्टी अदानी याला विकण्यापासून राज्य शासन व केंद्र शासन यांना विरोध दर्शवावा.. 

या आंदोलनाची भूमिका निश्चित ग्राहक राजाला त्रास देण्याची नाही परंतु या मुजोर सरकारला जागेवर आणायचे असेल तर कामगार बंधूंना पाठिंबा करण्याशिवाय पर्याय नाही व यामुळे ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीस हे सरकार आहे हे समजून घ्यावे.

 धन्यवाद 

आपलाच एक शेतकरी पुत्र,

 व एक वीज क्षेत्रातील कर्मचारी धन्यवाद..