नेवासा भाजप व शेतकर्‍यांच्या वतीने शेती पंपाचा वीज पुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी महावितरण कार्यालयावर मोर्चा.

नेवासा भाजप व शेतकर्‍यांच्या वतीने शेती पंपाचा वीज पुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी महावितरण कार्यालयावर मोर्चा.

शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नेवासा मध्ये वीज वितरण कंपनीच्या ऑफिस वरती भव्य मोर्चा काढण्यात आला आहे.

           शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती खूपच खालावलेली असताना कुठल्याच शेतमालाला रास्त भाव मिळत नसून शेतकऱ्यांची पिके शेतामध्येच उभे आहेत. सध्या उन्हाळा चालू असल्या मुळे पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे.पाण्याविना शेतकऱ्यांची पिके हाता तोंडाशी आलेली असताना व धरण 100% भरूनही शेतीसाठी पाणी सोडले जात नाही. त्यात माहविकास आघाडी सरकारकडून प्रत्येक दोन महिन्याला शेतकऱ्यांकडून सक्तीने पाच हजार रुपये वसूल करत आहे सद्यस्थितीला सरकार शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना 67 टक्के अनुदान देते म्हणजेच सोळा तासाचे पैसे सरकार भरते आणि वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांना फक्त आठ तासच वीज देते. शेतकऱ्यांचे वीज बिल जल सरकार भरत असेल तर वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांकडून कुठली वसुली पठाणी वसुली करते. असे प्रतिपादन नेवाशाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले.

       नेवासा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित मोर्चाच्यामध्ये माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी ठणकावून सांगितले की जोपर्यंत शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत वीज वितरण कंपनीच्या कुठल्या अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला गावामध्ये फिरकू देणार नाही.संपूर्ण तालुक्यातील वीज सबस्टेशन कुलूप ठोकून बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

       माजी खाजदर तुकाराम गडाख यांनी अजित पवार यांनी मागे केलेल्या एका भाषणामध्ये म्हणाले होते की जर शेतकऱ्यांची वीज कोणी कापली तर मी पवारांची अवलाद नाही. म्हणून तुकाराम गडाख यांनी जाहीर सभेत विचारले अजित पवार साहेब आज तुम्ही तरी सांगा कोणाचे आहात असा खोचक टोला मा. खासदार तुकाराम गडाख यांनी अजित पवार यांना लावला त्याच बरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील म्हणाले की हे महाविकस वसुली सरकार शेतकऱ्यांची कृषी पंपाची वीज खंडित करून शेतकऱ्यांना पूर्णपणे उध्वस्त करत आहे हे सरकार म्हणजे कुठलीही नीतिमूल्ये नसणारे सरकार आहे. यांना पूर्णपणे माहित आहे की परत आपल्याला कुणीही विचारणार नाही म्हणून यांनी फक्त वसुली चालवलेली आहे.म्हणूनच भाष्टाचारामध्ये अनेक मंत्री जेल भोगत आहे. व आपल्या जवळील मंत्री लवकरच इडीच्या जाळ्यात जाणार आहे.तसेच तालुक्याला जलसंधारण मंत्री असून धरण पूर्ण भरलेले असताना पाणी वेळेवर मिळतच नाही. म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती नेवासा तालुक्यातील जनतेची झालेली आहे.

वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता काकडे साहेब बडे साहेब व चकोर साहेब यांनी निवेदन स्वीकारले आहे.

   याप्रसंगी भारतीय जनता पार्टी नेवासा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी तसेच अंकुशराव काळे, राजूकाका मते, प्रताप चिंधे , कानडे बापूसाहेब ,देशमुख रावसाहेब , माऊली पेचे , व मनसेचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष दादा देशमुख आदींची भाषणे यावेळी झाली .

या मोर्चाला शहराध्यक्ष मनोज पारखे बाळासाहेब क्षीरसागर निरंजन डहाळे विश्वासराव काळे सुनील वाघ सचिन नागपुरे राजेंद्र मापारी येडू सोनवणे शरद जाधव अशोक टेकणे राजेंद्र कडू प्रतीक शेजुळं रविकांत शेळके कैलास दहातोंडे किरण जावळे अनिल जरें स्वप्नील जरे तुळशीराम काळे भाऊराव नगरे सतीश गायके तुळशीराम झगरें सूनीलरा वाघ. कल्याणराव मते बाबासाहेब नवथर जनाभाऊ जाधव रितेश भंडारी सुनील हारदे राजू वाखुरे.माऊली सोनवणे रमेश घोरपडे रमेश रोडे दत्तात्रय वरुडे अण्णा गव्हाणे देवेंद्र काळे अरुण गरड विष्णू गायकवाड निवृत्ती जावळे गौजीनाथ आगळे अशोक टेमक मोहन फुलासौंदर पराजी गुदडे येडू भाऊ सोनवणे रावसाहेब होन कैलास जाधव जाधव मामा संभाजी गडाख महेंद्र आगळे राजू शेख विशाल धनगर कडुबा हाडूळे लक्ष्मण माकोने संजय उदे गणेश मुरदरे अमोल खाटीक आबा डौले नाना डौले कुलकर्णी काका विकास गायकवाड अमोल लवांडे बाप्पुसाहेब दारकुंडे सुरेश डिके सुखदेव कदम दत्तात्रय राऊत दत्तात्रय वरखडे गंगा रासने प्रसिद्धीप्रमुखआदिनाथ पटारे सुनील डिके गणेश पटारे अजित नरोला शिवाजी भागवत संभाजी काजळे आकाश चेडे चांगदेव टकले निलेश कोकरे सोपान मुंगसे राजेश कडू.रमेश रोडे तुळशीराम शिंदे वसंत धुमाळ बाळासाहेब मोटे सुनील पतंगे दादा वाघ सूर्यकांत गुंड किशोर साबळे तुकाराम कनेरकर संतोष दरोडे महेश क्षीरसागर पिटेकर भारत अंकुश इटकर नानासाहेब शेंडे दत्तू लांघें प्रदीप रोडे पप्पू शेख सलमान शेख व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.