श्रीरामपूर:--डी पॉल इंग्लिश मेडियम स्कूल सीबीएसई, आगाशेनगर.येथे "राष्ट्रीय रंगोत्सव" चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण सम्पन्न...

श्रीरामपूर शहरा लगत असणाऱ्या डि पॉल इंग्लिश मेडियम स्कुल, सीबीएसई पॅटर्न,आगाशेनगर. येथे राष्ट्रीय रंगोत्सव चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात आले.यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त संस्थेचे प्रोव्हिन्सियल रेव्ह.फादर पॉल, मिशन सुपिरीयर रेव्ह.फादर हेबिक , शाळेचे प्रिन्सिपल रेव्ह. शिजो,वाईस प्रिन्सिपल सिस्टर दीप्ती,अॅडमिनिस्ट्रेटर रेव्ह.फादर थॉमस हे उपस्थीत होते. यावेळी सर्वप्रथम सर्व मान्यवराचे स्वागत लेझीम नृत्य सादर करून करण्यात आले. मान्यवराचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य रेव्ह. फादर शिजो यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यानंतर इयत्ता ७ वी आणि ८ वी च्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात नृत्य आणि गायन कार्यक्रमाचा समावेश होता. प्रमुख अतिथी रेव्ह .फादर.पॉल व रेव्ह. फादर हेबिक यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले. या स्पर्धेत 24 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व 11 विद्यार्थ्यांना सिल्व्हर मेडल देवून सन्मानित करण्यात आले.प्रमुख अतिथी रेव्ह फादर पॉल यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करतांना कोणकोणत्या अडचणी येतात व त्यावर कशी मात करावी यासाठी मार्गदर्शन केले. तसेच अभ्यासाव्यतिरिक्त विविध कालागुणांनाचा देखील जीवनात कसा समतोल राखला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक रेव्ह फा.शिजो उपमुख्याध्यापिका सिस्टर दीप्ती,अॅडमिनिस्ट्रेटर रेव्ह. फादर थॉमस, शाळेचे पी आर ओ अशोक पवार सर, सोनम वादवा,आशिष सर, स्मिता टीचर, इयत्ता ७ वी च्या वर्गशिक्षिका सुवर्णा मॅडम व हेमा मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ईश्वरी थोरात व कु. अक्षदा कदम या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रकारे केले. आभार प्रदर्शन कु.प्रियंका साहू या विद्यार्थीनीने केले तर कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि दीपक कदम यांचे सहकार्य लाभले. --- रिपोर्टर बीपीएल लाईव्ह न्युज निकाळे प्रकाश.