नेवासा तालुक्यातील दोन दिवसातील सलग तिसरी घटना .
खेडले परमानंद प्रतिनिधी //
घोडेगांव, ता. नेवासा परिसरातुन 2 गावठी कट्टे व 3 जिवंत काडतुसे बाळगणारे सराईत आरोपी जेरबंद.
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारा मार्फत पक्की माहिती मिळाली की किशोर माळी व कृष्णा फुलमाळी दोन्ही राहणार घोडेगांव, ता. नेवासा हे बेकायदेशीररित्या गावठी कट्टे (अग्निशस्त्र) आपल्या जवळ बाळगुन ते विक्री करण्याच्या उद्देशाने घोडेगांव ते लोहगांव जाणारे रोडवर, घोडेश्वरी शाळेच्या पाठीमागे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीची हकीगत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करण्याबाबत पथकास आदेश दिले.
पथकाने दिनांक 16/2/24 रोजी पंचासह घोडेगांव ते लोहगांव रोडवर, घोडेश्वरी शाळेच्या पाठीमागे सहरील ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले असता 3 इसम शाळेच्या पाठीमागे येवुन थांबले.
सदर इसमांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथक त्यांना ताब्यात घेण्याच्या तयारीत असतांना 1 संशयीत इसम पोलीस पथकाची चाहुल लागताच पळुन गेला.
उर्वरीत इसम 1) किशोर तुकाराम माळी वय 30, रा. लोहारवाडी, ता. नेवासा व
2) कृष्णा येलप्पा फुलमाळी वय 33, रा. घोडेगांव, ता. नेवासा यांना पथकान शिताफीने ताब्यात घेतले.
त्यांचेकडून पळुन गेलेल्या इसमाचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी पळुन गेलेल्या इसमाचे नाव 3) आकाश अनिल फुलमाळी रा. घोडेगांव, ता. नेवासा (फरार) असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या संशयीतांची अंगझडती घेतली असता अंगझडतीत 60,000/- रुपये किंमतीचे 2 गावठी कट्टे, 1,500/- रुपये किमतीचे 03 जिवंत काडतुसे असा एकुण 61,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर गावठी कट्टे व काडतुसे कोठुन आणले याबाबत विचारपुस करता, ताब्यातील इसमांनी गावठी कट्टे व जिवंत काडतुस हे 4) गणेश साबळे रा. सोनई ता. नेवासा (फरार) यांचेकडुन विक्री करणे करता आणल्याचे सांगितल्याने आरोपी विरुध्द सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं. 61/2024 आर्म ऍ़क्ट 3/25, 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे. यापुढे देखील अवैध शस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढुन त्यांच्या विरुध्द कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
आरोपी नामे कृष्णा यल्लाप्पा फुलमाळी हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व पुणे जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत व आर्म ऍ़क्ट असे गंभीर स्वरुपाचे एकुण - 09 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. नेवासा 191/2011 भादविक 307,324,452,143
2. एमआयडीसी 43/2013 भादविक 326,323,143
3. सोनई 85/2014 भादविक 307,143,147
4. शनि-शिंगणापुर 24/2016 आर्म ऍ़क्ट 3/25,7
5. खडकी (पुणे.शहर) 3096/2016 आर्म ऍ़क्ट 3/25
6. सोनई 07/2017 आर्म ऍ़क्ट 3/25,7
7. सोनई 12/2018 आर्म ऍ़क्ट 3/25
8. सोनई 277/2021 भादविक 307,201,506 आर्म 3/25
9. सोनई 362/2022 भादविक 341,324,323,504,506,34
आरोपी नामे किशोर तुकाराम माळी हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, बलात्कार व इतर कलमान्वये एकुण - 03 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. सोनई 495/2023 भादविक 307 (फरार)
2. सोनई 446/2022 म.जु.का.क 12(अ)
3. पाथर्डी 88/2018 भादविक 376(ई),पोक्सो 3,4
सदर कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर व वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व मा. सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.