बालाजी देडगाव येथे एकलव्य संघटनेची स्थापना मोठ्या उत्साहात संपन्न.
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे महाराष्ट्रभर कार्यरत असणारी एकलव्य संघटने च्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्टँड वरील फलकाचे अनावरण करण्यात आले .त्यानंतर गावभर मोठी मिरवणूक काढून एकलव्य जल्लोष मध्ये प्रमुख पाहुण्यांची मोठी उपस्थित होती. यानंतर हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष श्री. पवनराजे सोनवणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी सर्व उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सन्मान सोहळा पार पडला.
या कर्माचे प्रास्ताविक एकलव्य संघटनेचे गणेश मोरे यांनी केले .तर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष श्री सुधाकरराव वाघ साहेब, प्रदेश संघटक श्री .प्रा .सचिन कुमार बर्डे यांनी आपले विचार समाजापुढे मांडले .समाज कसा पुढे नेता येईल या गोष्टीवर भर दिला जाईल. संघटनेच्या माध्यमातून सर्व रखडलेली कामे, सर्व प्रकारचे दाखले, रेशन कार्ड ,गायरान जमीन, स्मशानभूमी ,गावठाण जागा ,शबरी घरकुल योजना, आदिवासी जमीन ,हस्तांतरण, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूची उपशाखा नेवासा तालुक्यात असावी अशा अनेक विविध गोष्टीवर मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष प्रमोद थोरात, प्रदेश संपर्कप्रमुख श्री सुनील गांगुर्डे दक्षिण जिल्हा अध्यक्ष शिवाजी मोरे, युवा नेते श्रीकांत भाऊ हिवाळे ,आशिष दादा हिवाळे, सचिन हिवाळे, गणेश गायकवाड ,रघुनाथ काटकर, देडगाव शाखा अध्यक्ष कृष्णा मोरे, कृष्णा काटकर, गोरख माळी ,विलास मोरे, ज्ञानदेव मोरे ,राजू गांगुर्डे द विजय मोरे, विठ्ठल बर्डे व महिला भगिनी व ब्लॅक टायगर फोर चे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व देडगाव ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार इनुस पठाण यांनी केले तर आभार सचिन हिवाळे यांनी मानले.