जिल्ह्यात अवकाळी व गारपिटीचे थैमान ! 21 हजार 768 हेक्टरवर नुकसान.
बुलढाणा ( प्रतिनिधी ) :- सोमवारी संध्याकाळी २६ फेब्रुवारीच्या रात्री जिल्ह्यात प्रचंड गारपीटीसह मुसळधार पाऊस पडला. या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे कांदा, हरभरा, गहू, मका व ज्वारी तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील २१ हजार सातशे ६८ हेक्टरवर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा कृषी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील २६९ गावांना याचा फटका बसला आहे.
निमगांव वायाळ येथील चाटे यांच्या गोठ्यात असलेल्या जनावरापैकी एका म्हशीचे वासरू सायंकाळी झालेल्या वादळीवाऱ्यासह गारपीट झाल्याने वादळाने गोठ्यावरील पत्रे उडून गेल्याने त्यावरील दगड वासराच्या अंगावर पडून वासरू मृत पावले. याचा पंचनामा तलाठ्याकडून करण्यात आला आहे. मासरूळ शिवरात सुध्दा पानमळ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारकडून पानमळ्यांना विमा कवच नसल्याने पानमळ्यावाला शेतकरी सुध्दा अडचणीत आला आहे. अचानक आलेल्या या वादळामुळे व गारपीटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला
आहे. अगोदरच खरीपाचे उत्पन्न हे अतिशयकमी मिळाले असून, खर्चाच्या मानानेत्यालाही भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात असतांनाच पुन्हा रब्बीतही यावेळेस तिसन्यांदा अवकाळीने कहर केला असून, दुसऱ्यांदा गारपीट झाली आहे. बुलढाणा तालुक्यातील मासरूळ, धामणगांव परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. मलकापूर, लोणार, संग्रामपूर, शेगाव या तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीटझाल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ही पिके जमीनदोस्त झाल्याने पुन्हा शेतकऱ्यांसमोर अवकाळीमुळे पिकांचे झालेले नुकसान आस्मानी संकट उभे ठाकले आहे. लोणार तालुक्यातील किनगाव जडू, बीबी, देवानगर, गोवर्धन नगर या भागात जोरदार पावसासह गारपीट झाली. किनगांवराजा परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. तर सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा, दुसरबिड या भागातही गारपीट झाली, तसेच शेगाव तालुक्यातील भोनगावात जवळपास एका तासापेक्षा अधिक वेळेत गारपीट झाल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामध्ये शेकडो क्विंटल हरभऱ्याची पोते मिजली. या ठिकाणी जोरदार वादळ पाहायला मिळाला त्यामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
कृषी विभागाकडून नुकसानीचा आढावा घेण्यात येऊन तातडीने अंदाज काढण्यात आला आहे, यामध्ये बुलढाणा तालुक्यातील १२ गावे बाधीत झाली असून, ३ हजार ४०० शेतकऱ्यांचे २१९० हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झालेले आहे. तर खामगाव तालुक्यातील २५ गावांतील ५१२ शेतकऱ्यांचे ३८७ हेक्टर, नांदुरा तालुक्यातील २३ गावांतील २३५० शेतकऱ्यांचे १२०० हेक्टर, जळगाव जामोद तालुक्यातील ५४ गावांतील ४ हजार ४८८तालुक्यातील १०५ गावातील २५ हजार
३२२ शेतक-यांचे ८ हजार ८९२ हेक्टर, लोणार तालुक्यातील ११ गावातील ९५० शेतकऱ्यांचे ८९० हेक्टर तर देऊळगावराजा तालुक्यातील ११ गावे बायीत असून, १ हजार ५७० शेतकन्यांचे २ हजार ३१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. अवकाळीमुळे गहू, हरभरा, मका, कांदा, पानमळे, फळबागा सह इतर पिकांचे क्षेत्र बाधीत झाल्याचे यामध्ये नमूद आहे. यामध्ये मेहकर, चिखली, मोताळा, मलकापूर, शेगाव आदी तालुक्यांत नुकसानच नाही, असाही अंदाज कृषी विभागाचा आहे. अर्थात जेथे पाऊस पड़ला तेथे नुकसान होतेच. अर्थात हा अंदाज असून, प्रत्यक्ष पाहणीत नुकसानीचा आकड़ा वाढण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, आज २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी अवकाळी पावसाने जिल्ह्यात धूमाकूळ घातला. जिल्ह्यात इतर भागासह मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा परिसरात जवळजवळ एक तास पाऊस कोसळत होता. तसेच जानेफळसह, चिखली, सिंदखेडराजा व इतरही भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा, तसेच कांदा, ज्वारी व अन्य पिकांचेही नुकसान झाले आहे.