अहमदनगरच्या शिर्डी येथे शासन आपल्या दारी उपक्रम मोठ्या उत्सहात साजरी.
शिर्डी येथे शासन आपल्या दारी उपक्रम मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे ,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, आणि ना.अजित पवार महसूल तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. विविध शासकीय योजनांच्या पात्र लाभार्थीना प्रातिनिधीक स्वरुपात धनादेश आणि औजारांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री ना.दिपक केसरकर ,खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील, खा.सदाशिव लोखंडे,आ.राम शिंदे, मा.आ शिवाजीराव कर्डिले साहेब, आ.बबनराव पाचपुते,आ.मोनिका राजळे ,आ.डॉ किरण लहामटे, आ.सत्यजीत तांबे ,विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे सौ.स्नेहलता कोल्हे मा.वैभव पिचड भाजपाचे जिल्हाध्यक्ष मा विठ्ठलराव लंघे उपस्थित होते.