रज्जाकपूर गावात सरपंच, ग्रामस्थांकडून आहे कृषिदुतांचे स्वागत .

रज्जाकपूर गावात सरपंच, ग्रामस्थांकडून आहे कृषिदुतांचे  स्वागत .

बीड, दि. १७:- वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत आदित्य शिक्षण संस्थेच्या जिल्हा बीड आदित्य कृषि महाविद्यालयाचे कृषिदूत संकेत लांबे,विशाल लांबे,समर्थ गव्हाणे,संकेत शिरसाठ, श्रीदिप वलेकर,प्रदीप लगड,धनंजय पाचपुते,श्रीशैलम नाजरे,यांचे ग्रामीण कृषि कार्यानुभव व कृषि औद्योगिक कार्यक्रम २०२३-२४ च्या अभ्यास दौऱ्यानिमित्ताने रज्जाकपुर येथे आगमन झाले.रज्जाकपुर येथील सरपंच व ग्रामस्थांनी कृषिदुतांचे स्वागत केले. या अभ्यास दौऱ्या दरम्यान कृषिदुत शेतकऱ्यांना शेती विषयक शास्त्रीय माहिती, हंगामा प्रमाणे पीक पद्धती, रासायनिक खतांचा योग्य वापर, कीटकनाशके फवारताना घ्यायची काळजी कीटकनाशक आणि सेंद्रिय शेती याबद्दल माहिती दिली. अभ्यास दौऱ्याचा कालावधी चार महिन्यांचा असून यादरम्यान माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, कीड रोग, पीक संरक्षण याबाबत प्रात्यक्षिक घेतले जातील. आगमनावेळी रज्जाकपुर येथील सरपंच श्री.भगवाण डफाळ, ग्रामसेवक श्री.चाळक व उपसरपंच श्री. भागवत खाकरे, आणि ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.या अभ्यास दौऱ्या विद्यार्थ्यांना आदित्य शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष डॉ. अदिती सारडा आणि आदित्य कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुकाराम तांबे, प्राचार्य श्याम भुतडा, कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप मोरे आणि कार्यक्रम अधिकारी प्रा.युवराज धावने व महाविद्यालयातील इतर प्राध्यापक आणि सर्व विषय तज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे.